Join us  

घरात झुरळांचा वावर वाढलाय? पाण्यात मिसळा ३ गोष्टी; लादी पुसताच झुरळं होतील गयाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 10:08 AM

1 Remedy that prevent cockroaches and bugs in kitchen : झुरळांना घरातून 'या' पद्धतीने पळवून लावा

घरातल्या झुरळांना पळवून लावणं म्हणजे कठीण काम (Cockroaches). स्प्रे किंवा खडूचा वापर केल्यानंतर, तेवढ्यापुरतीच झुरळं घरातून गायब होतात (Cleaning Tips). पण पुन्हा घराचा ताबा झुरळं घेतातच. हळूहळू झुरळांची पिल्ले अन्नपदार्थांवर फिरतात. ज्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता निर्माण होते. शिवाय गंभीर आजारांचाही धोका वाढतो.

झुरळांचा घरात वावर वाढल्यावर, त्यांना मारणंही नको वाटतं. जर घरात झुरळं फार झाले असतील, आणि त्यांना पळवून लावायचं असेल तर, काही घरगुती उपाय करून पाहा. या घरगुती उपायांमुळे अगदी काही मिनिटात घरातून झुरळं पळ काढतील. शिवाय घरात पुन्हा झुरळांचा वावर होणार नाही(1 Remedy that prevent cockroaches and bugs in kitchen).

दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन

घरातून झुरळांना पळवून लावण्यासाठी काही टिप्स

काळी मिरी पावडर

आपण लादी पुसूनही झुरळांना पळवून लावू शकता. यासाठी एका बादलीमध्ये पाणी घ्या. त्यात काळी मिरी पावडर मिसळा, आणि या पाण्याने फरशी पुसून घ्या. किंवा काळी मिरी पावडरचा वापर करून स्प्रे तयार करा. तयार स्प्रे ज्या जागी झुरळांचा वावर आहे, त्या ठिकाणी फवारणी करा. काळी मिरीच्या तीव्र गंधाने पुन्हा झुरळं फिरकणार नाही.

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

कडूलिंबाचे तेल

झुरळांना पळवून लावण्यासाठी आपण कडूलिंबाच्या तेलाचाही वापर करू शकता. ज्या ठिकाणी झुरळांचा वावर आहे, त्या ठिकाणी कडूलिंबाचे तेल शिंपडा. किंवा पाण्यात कडूलिंबाचे तेल घालून फरशी पुसून घ्या. आपण कडूलिंबाच्या पावडरचाही वापर करू शकता. कडूलिंबाच्या तीव्र गंधामुळे झुरळं पळ काढतील.

तमालपत्र

झुरळांना पळवून लावण्यासाठी आपण तमालपत्राचाही वापर करू शकता. झुरळांना तमालपत्राच्या नैसर्गिक सुगंधाची ऍलर्जी असते. अशा परिस्थितीत झुरळांवर तमालपत्राचा वापर केला जाऊ शकतो. तमालपत्र पाण्यात उकळून हे पाणी स्प्रे बाटलीत भरून ठेवा. झुरळांवर तमालपत्राचे पाणी शिंपडा. यामुळे झुरळं घरातून पळ काढतील. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल