Join us  

साड्या ठेवण्यासाठी कपाटात जागाच उरली नाही ? १ सोपी ट्रिक, छोट्याशा कपाटातही राहतील भरपूर साड्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2023 4:10 PM

1 Organization Trick for People With Too Many Clothes : साड्या फार आणि जागा कमी, ठेवणार कुठं असा प्रश्न पडलाय, ही घ्या सोपी ट्रिक...

साडी हा प्रत्येक स्त्रीचा आवडता विषय असतोच. साडी हे स्त्रियांचे मुख्य वस्त्र आहे. आपल्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असाव्यात असं प्रत्येकीलाच वाटत असत. साड्यांची खरेदी करायला तर महिलांना निमित्तच हवे असते. सणवार, लग्नसमारंभ, वाढदिवस अशा या ना त्या निमित्ताने साडी खरेदी ठरलेलीच असते. मग अमुक एक नवीन पॅटर्न आलाय, असा रंग आपण बरेच वर्षात घातला नाही. हिच्याकडे आहे तशी साडी मलाही हवी अशा एक ना अनेक गप्पा सुरू होतात. महिलावर्गाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या साडीसाठी महिला कितीही तास फिरु शकतात किंवा कितीही दुकानं पालथी घालू शकतात. काहीवेळा आपण आवडली म्हणून तर काहीवेळा केवळ हौस म्हणून साड्यांची खरेदी करतो(How to arrange clothes in small Cupboard).

साड्या विकत घेताना तर आपण आवडीनुसार, अगदी तासंतास वेळ खर्ची करून साडी घेतो. परंतु या साड्या घेतल्यानंतर त्यांची तितकीच काळजी देखील घ्यावी लागते. साड्यांची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्याचे कापडं लगेच खराब होते. काहीवेळा आपल्या कपाटात इतक्या साड्या होतात (How to store too many sarees in small wardrobe) की त्या ठेवणे मुश्किल होते. (How do you organize too many clothes in a small wardrobe?) साड्या व्यवस्थित घडी करून हँगरला लावून ठेवल्या नाहीत तर त्याचे कापड खराब होऊ लागते. काहीजणींकडे साड्यांचे इतके प्रकार असतात की त्या ठेवायला कपाटातील जागा कमी पडते. अशावेळी एक सोपी ट्रिक वापरून आपण कपाटातील कमी जागेत देखील भरपूर साड्या ठेवू शकतो(1 Storage Saving Ideas to Keep Your Clothes Organized).

 कपाटातील कमी जागेत भरपूर साड्या ठेवण्याची सोपी ट्रिक... 

कपाटात कपडे ठेवताना आपण शक्यतो ते व्यवस्थित राहावे या हेतूने हँगरला लावून ठेवतो. पण काहीवेळा कपाटात कपडे जास्त होतात ते ठेवण्यासाठी जागाच पुरत नाही. अशावेळी एका सोप्या ट्रिकचा वापर करून आपण एकाच हँगरला कपडे लटकवून कपाटातील इतर जागा वाचवून त्या जागेत बाकीचे कपडे ठेवू शकतो. 

कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...

साबण - पाण्याशिवाय तेलकट कंगवा स्वच्छ करा, एक सोपी ट्रिक... कंगवा दिसेल नव्यासारखा...

या ट्रिकचा वापर करण्यासाठी आपल्याला हँगर व मेटल्सच्या वापरात नसलेल्या बांगड्या लागतील. यासाठी सगळ्यांत आधी आपण एक हँगर घेऊन त्या हँगरला आपली साडी व्यवस्थित घडी करून नेहमीप्रमाणे लावून घ्यावी. त्यानंतर हॅंगरचे सर्वात वरचे टोक म्हणजे आपण हँगर लटकवतो त्या आकड्या सारख्या भागातून एक मेटलची गोल बांगडी घालावी. ती गोल बांगडी त्या सी आकाराच्या आकड्याच्या बरोबर मधोमध येईल अशी ठेवावी. आता या गोल बांगडीत आपण दुसरा एक हँगर लटकवू शकतो. (व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे) असे आपण एका खालोखाल एक हँगर लावून कपाटातील बरीच जागा वाचवू शकतो. तसेच या जागेत आपण हीच सोपी ट्रिक वापरून इतरही कपडे लावू शकतो.

मिक्सर ग्राईंडरच्या खालचा भाग स्वच्छ करणे कठीण काम? १ सोपी ट्रिक, मिक्सर ग्राईंडर दिसेल नव्यासारखे..

वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...

अशाप्रकारे आपण ही सोपी ट्रिक वापरून कपाटातील बरीच जागा वाचवू शकतो. याचबरोबर कमी जागेत जास्त कपडे ठेवण्यासाठी जागेचा योग्य वापर करु शकतो.

टॅग्स :सोशल व्हायरल