Lokmat Sakhi >Social Viral > खिडक्या, दरवाज्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी बटाट्याचा असा करा वापर, काचा होतील नव्यासारख्या लख्ख...

खिडक्या, दरवाज्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी बटाट्याचा असा करा वापर, काचा होतील नव्यासारख्या लख्ख...

1 surprising ways you can use potatoes to clean glass of windows & doors : काचेच्या खिडक्या, दरवाजे सहजपणे स्वच्छ करण्यासाठी बटाट्याचा ३ वेगवेगळ्या पद्धतीने करा वापर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2024 06:52 PM2024-08-12T18:52:55+5:302024-08-12T19:03:18+5:30

1 surprising ways you can use potatoes to clean glass of windows & doors : काचेच्या खिडक्या, दरवाजे सहजपणे स्वच्छ करण्यासाठी बटाट्याचा ३ वेगवेगळ्या पद्धतीने करा वापर...

1 surprising ways you can use potatoes to clean glass of windows & doors | खिडक्या, दरवाज्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी बटाट्याचा असा करा वापर, काचा होतील नव्यासारख्या लख्ख...

खिडक्या, दरवाज्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी बटाट्याचा असा करा वापर, काचा होतील नव्यासारख्या लख्ख...

आपले घर स्वच्छ, टापटीप, नीटनेटके असावे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे आपण घराचा कानाकोपरा अगदी बारकाईने स्वच्छ करतो. आपण घराची साफ सफाई अगदी रोज केली तरीही घरात धूळ, कचरा हा होतोच. घरातील वस्तू, खिडक्या, दरवाजे यांवर बरीच धूळ आणि घाण साचते. असे असले तरीही जर रोजच्या रोज थोडी साफसफाई केली तर घरात जास्त धूळ, घाण होत नाही. फरशी, टाईल्स, घरातील इतर वस्तू हे तर आपण साफ करतोच पण घरातील खिडक्यांच्या काचांवर बसणारी धूळ साफ करणे हे एक मोठे आव्हान असते. या काचा पारदर्शक असतील तर धूळ आणि डागांनी अनेकदा त्यातून पलीकडचे काहीच दिसेनासे होते(Why Are People Cleaning Their Glasses With Potatoes?).

खराब झालेल्या काचा आपण ओला फडका किंवा कागदाने पुसतो. परंतु त्यावरचे पाण्याचे किंवा धुळीचे डाग तसेच राहतात. घरातील काचेच्या स्लायडिंग विंडो किंवा दरवाजे स्वच्छ करण्यासाठी आपण किचनमधील बटाट्याचा वापर करु शकतो. महागड्या क्लिनर्स आणि लिक्विड सोप पेक्षा आपण या बटाट्याचा वापर करून घरातील काचेच्या स्लायडिंग विंडो किंवा दरवाजे अगदी नव्यासारखे लख्ख करु शकतो. बटाट्यामध्ये असलेले एन्झाईम खिडक्यांवरील हट्टी डाग सहजपणे साफ करू शकतात. काचेच्या खिडक्यांना तेलकट, चिकट हातांचे डाग लागतात परंतु हे डाग आपण बटाट्याच्या मदतीने देखील स्वच्छ करु शकतो. घरातील काचेच्या स्लायडिंग विंडो किंवा दरवाजे स्वच्छ करण्यासाठी बटाट्याचा वापर नेमका कसा करावा ते पाहूयात(1 surprising ways you can use potatoes to clean  glass of windows & doors).

काचेच्या स्लायडिंग विंडो किंवा दरवाजे स्वच्छ करण्यासाठी... 

१. कच्चा बटाटा :- काचेच्या खिडक्या स्वच्छ करण्याचा हा एक अतिशय सोपा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक कच्चा बटाटा लागेल. एक कच्चा बटाटा घेऊन तो मध्यभागी अर्धा कापून घ्यावा. आता बटाट्याचा कापलेला भाग थेट काचेच्या खिडकीवर घासून घ्यावा. काहीवेळ ते तसेच राहू द्यावे म्हणजे बटाट्याच्या रसाने खिडकीच्या काचेवरील डाग सहज खाली ओघळून येतील. आता खिडकी पुसण्यासाठी स्वच्छ कापड किंवा कागदी टॉवेल वापरा. सगळ्यात शेवटी, काचेची खिडकी कोरड्या लिंट - फ्री कापडाने स्वच्छ पुसून घ्या. 

एअरफ्रायरमध्ये पदार्थ गरम करताना ३ चुका टाळा, चवही बदलते आणि होते ' हे ' नुकसान...

२. बटाट्याचा रस :- काचेच्या खिडक्या स्वच्छ करण्यासाठी बटाट्याचा रस देखील वापरला जाऊ शकतो. यासाठी प्रथम बटाटे किसून घ्या आणि नंतर बारीक गाळणी वापरून त्या बटाट्याचा रस पिळून घ्या. आता बटाट्याचा रस आणि पाणी समान प्रमाणात घेऊन मिक्स करावे. पाणी आणि बटाट्याच्या रसाचे तयार केलेले द्रावण एका स्प्रे बाटलीत भरुन घ्यावे. आता हे द्रावण काचेच्या खिडकीवर स्प्रे करा. थोडावेळ ते तसेच राहू द्यावे, नंतर स्वच्छ कापडाने किंवा कागदाच्या टॉवेलने खिडकी पुसून घ्यावी. हा उपाय केल्याने खिडकीवरील डाग जाऊन खिडकीच्या काचेला एक विशिष्ट प्रकारची चमक येते. 

३. उकडलेल्या बटाट्याचे पाणी :- उकडलेल्या बटाट्याच्या पाण्यात विरघळलेला स्टार्च असतो, ज्यामुळे काचेच्या खिडक्या साफ करण्यास मदत होते. खिडक्यांच्या काचेची हळुवार स्वच्छता करायची असेल तर या पद्धतीचा वापर करता येऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम बटाटा मऊ होईपर्यंत पाण्यात उकळून घ्या. आता बटाटे बाहेर काढा आणि पाणी थंड होऊ द्या. बटाट्याचे थंड केलेले पाणी कापड किंवा स्पंजच्या साहाय्याने काचेच्या खिडकीवर लावून काचा स्वच्छ पुसून घ्याव्यात. आता काच ओल्या कापडाने पुसून टाका, नंतर डाग काढण्यासाठी कोरड्या कापडाने पुसून घ्यावे. अशाप्रकारे आपण उकडलेल्या बटाट्याचे पाणी फेकून न देता त्याचा देखील खिडक्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी वापर करु शकतो.

ब्रेड शिळा झाला म्हणून फेकून देता? ३ भन्नाट ट्रिक्स, शिळा ब्रेड होईल फ्रेश - आणि खाताही येईल पटकन...

 

Web Title: 1 surprising ways you can use potatoes to clean glass of windows & doors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.