कोणताही सण असो, हातावर मेहेंदी (Mehendi Design) हवीच. हातावर मेहेंदी काढल्याने पारंपारिक लूक पूर्ण होतो. नागपंचमीनंतर सणावाराला सुरुवात होते. बऱ्याच महिला आणि बच्चे कंपनी हातावर आवर्जुन मेहेंदीचे विविध डिझाईन काढतात. हातावर मेहेंदी काढताच हाताची शोभा वाढते, शिवाय हात सुंदर दिसतात. पण अनेकांना हातावर मेहेंदी काढायला जमत नाही.
अवघड वाटणारे डिझाईन बघताच अनेक महिला हातावर मेहेंदी काढण्यास टाळतात. पण जर आपल्याला सुंदर पारंपारिक मेहेंदी काढायची असेल तर, हातावर १ ते १० आकडे लिहून मेहेंदी काढा. आता तुम्ही म्हणाल १ ते १० आकडे लिहून मेहेंदी काढायची कशी? आपण हातावर १ ते १० आकडे लिहून पारंपारिक, सुंदर-सिंपल डिझाईन काढू शकता. सोप्या पण पारंपारिक पद्धतीची मेहेंदीची डिझाईन कशी काढायची पाहा(1 to 10 Easy Number mehndi designs).
‘डीपफेक’ व्हिडिओत रश्मिकाचा चेहरा जिच्या व्हिडिओवर लावण्यात आला ‘ती’ मुलगी कोण? नक्की करते काय?
हातावर १ ते १० आकडे लिहून मेहेंदी कशी काढायची?
- सर्वप्रथम, मधल्या बोटापासून सुरुवात करा. मधल्या बोटापासून सुरुवात करून मनगटापर्यंत १ ते १० खालच्या बाजूने आकडे लिहून घ्या. नंतर त्याच्या भोवतीने डिझाईन काढून घ्या. आकड्याच्या मदतीने मेहेंदी काढणं आपल्याला सोपं जाईल. आपण त्या आकड्याच्या भोवतीने वेस्टर्न डिझाईन देखील काढू शकता. संपूर्ण हातावर मेहेंदी डिझाईन काढून झाल्यानंतर इतर बोटांवर देखील हलकी छोटी डिझाईन काढून मेहेंदी पूर्ण करा. सुटसुटीत पण सुबक अशी मेहेंदी डिझाईन काही मिनिटात रेडी होईल.
- जर आपल्याला भरगच्च मेहेंदी डिझाईन आवडत असेल तर, आपण त्यात मोराचा आकार, चक्र, कोयरी, पानाची डिझाईन काढून मेहेंदी पूर्ण करू शकता.
- सध्या महिलांमध्ये अरेबिक मेहंदीचे फॅड वाढत चालले आहे. आपण ट्रेडीशनल ड्रेस किंवा वेस्टर्न साडीवर पारंपरिक आणि अरेबिक मेहंदीचे कॉम्बिनेशनची मेहेंदी डिझाईन काढू शकता. ही मेहेंदी डिझाईन कोणत्याही पोशाखावर शोभून दिसेल.