Join us  

रोजचा स्वयंपाक पटकन होईल-पदार्थ होतील चवदार! १० किचन टिप्स-वेळ, मेहनत दोन्ही वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 4:50 PM

10 Time Saving Cooking Hacks : स्वयंपाकासाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी हे हॅक्स उत्तम ठरतील. (10 Time Saving Cooking Hacks)

महिलांचा सगळ्यात जास्तवेळ स्वंयपाकघरात जातो. (Kitchen Tips) स्वयंपाक बनवण्यासाठी जास्तवेळ लागत नसला तरी आवरा-आवर आणि घरातील इतर कामं करायचं म्हटलं  की थोडा वेळ जातोच. काही सोपे किचन हॅक्स तुमचं काम अधिकच सोपं करतील. याशिवाय जेवणही पटापट बनून तयार होईल. (Cooking Hacks) स्वयंपाकासाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी हे हॅक्स उत्तम ठरतील. (10 Time Saving Cooking Hacks)

 वेळ वाचवणारे कुकींग हॅक्स (Easy Cooking Hacks To Save Time In The Kitchen)

१) भजी बनवताना बॅटरमध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा. जेणेकरून भजी जास्त मऊ- क्रिस्पी बनतील.

२) कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात १ चिमूट मीठ घाला. यामुळे त्याची चव अधिकच चांगली लागेल.

३) भात शिजवताना त्यात १ चमचा तूप आणि काही थेंब लिंबाचा रस घाला. यामुळे भात अधिक मऊ-मोकळा शिजेल.

४) ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदा भाजताना त्यात अर्धा छोटा चमचा साखर घाला.  साखर कॅरेमलाईज होऊन ग्रेव्हीला चांगला रंग येईल.

५) पुऱ्या तळण्याच्या  १० मिनिटं आधी फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे फ्राय करताना पुऱ्यांमध्ये जास्त तेल शिरणार नाही.

रोजच्या जेवणात साधी चपाती खावी मल्टीग्रेन चपाती? आहारतज्ज्ञ सांगतात हे खाण्याचे फायदे-तोटे

६) रव्याचा शीरा बनवताना त्यात अर्धा चमचा बेसनाचं पीठ मिसळा. यामुळे चव दुप्पटीने चांगली लागेल. 

७) कोणत्याही ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झालं तर थोड्यावेळासाठी फ्रिजरमध्ये ठेवा. ज्या ठिकाणी जास्त तेल जमा झालं आहे ते तुम्ही आरामात काढून फेकू शकता. ही डिश सर्व्ह करण्याआधी व्यवस्थित गरम करून घ्या. 

८) जर भेंडीची भाजी जास्त चिकट चिपचिपीत बनत असेल तर त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला. यामुळे चिकटपणा निघून जाईल याव्यतिरिक्त भेंडी बनवताना त्यात १ चमचा भाजलेलं बेसन घाला. यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी कुरकुरीत बनेल.

कोण म्हणतं फक्त बदामातून प्रोटीन मिळतं? मूठभर शेंगदाणे रोज खा, भरपूर कॅल्शियम मिळेल

९) इस्टंट लिंबू पाणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी  २ कप साखरेच  १ कप पाणी मिसळून त्यात  ४ ते ५ लिंबू मिसळा. हे मिश्रण आईस ट्रेमध्ये घालून फ्रिज करून घ्या. जेव्हाही तुम्ही लिंबू पाणी बनवत असाल तेव्हा २ क्यूब ग्लासमध्ये घाला. आवडीनुसार मीठ घाला त्यानंतर पाणी घालून मिक्स करा.  या ड्रिंकमध्ये तुम्हाला वेगळा बर्फ घालण्याची गरज नाही. 

१०) लसूण पटकन सोलून होण्यासाठी एका डब्यात भरून शेक करा. या उपायाने लसणाचे साल लगेचच निघून जाईल. याशिवाय लाटण्याच्या साहाय्याने लसूण लाटून घ्या यामुळे लसणाचे साल लगेच निघेल.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स