आजी आपल्या नातवंडासाठी (Grandmother & Grand Child Bond) सर्वस असते. ती आई, आजी, मैत्रीण आणि शुभचिंतक बनून सल्ले देत असते. कारण त्यांनी आपल्याहून अधिक पावसाळे पाहिलेले असतात. पण पूर्वीपेक्षा आधीच्या काळातील लोकं फिट अँड फाईन दिसत असत. कारण पूर्वीच्या काळातील लोकं स्वतःच्या तब्येतीकडे अधिक लक्ष द्यायचे. उत्तम आहार, व्यायाम, सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे, वेळेवर जेवण करणे. यासह इतर चांगल्या सवयींमुळे ते लोकं १०० हून अधिक वर्ष जगायचे (Good Habits of Lifestyle).
फार कमी लोकं आहेत, ज्यांनी शंभरी गाठली असेल. अशाच एका आजीबाईंनी शंभरी गाठली तर खरी, पण तिला १०० वर्ष गाठल्यावर प्रतिक्रिया विचारली असता, तिने शंभरी नसून, पन्नाशीत असल्याची प्रतिक्रिया दिली (Social Viral). तिचं हे भन्नाट उत्तर सोशल मीडियात व्हायरल होत असून, अनेकांनी कमेण्ट करत तिच्या या कॉन्फिडन्सचं कौतुक केलंय(100 years old grandmother still feels like she is in her 50s, see the amazing reaction of grandmother..).
वेलबीइंग कोचच्या फिटनेस ट्रेनर चेलसिया डोर्नन हिने आपल्या आजीचा एक व्हिडिओ तयार केला. ज्यात तिने तिला शंभर वर्ष गाठल्यानंतर कसे वाटते, यावर तिची रिअॅक्शन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. व्हिडिओमध्ये चेलसिया आपल्या आजीला, 'तू लवकरच शंभर वर्षांची होणार आहेस.' हे ऐकताच आजीबाई शॉक होते. तिने कोणते वर्ष चालू आहे, असे आपल्या नातीला विचारले. त्यावर चेलसिया पुढे म्हणते, 'सध्या २०२३ चालू आहे.' त्याबर आजीबाई, 'म्हणजे माझा जन्म १९२३ चा? मी शंभर वर्षांची झाली?'
त्यावर नात चेलसिया, 'हो, तू शंभर वर्षांची झालीस. यावर तुझा विश्वास बसतोय का?' यावर आजीबाईंनी भन्नाट उत्तर दिलं, जे ऐकून नक्कीच सगळ्यांना तिच्या कॉन्फिडन्सचं कौतुक वाटेल. आजीबाई म्हणतात, 'मला वाटत नाही, मी १०० वर्षांची झाली आहे. मला असं वाटतंय मी आत्ताशी पन्नाशी गाठलीय. मला असे वाटते मी खूप हेल्दी आहे. प्लीज देवा, मला आणखीन १०० वर्ष जगायचे आहे. देवा, माझं ऐका, मला फसवू नका.'
तिचं हे भन्नाट उत्तर ऐकताच नात कौतुकाने आजीकडे पाहत हसते. या व्हिडिओवर कमेण्ट करत अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. एकाने, 'विचार करा जर आजीबाई २१०० या वर्षापर्यंत जागल्या तर? त्यांची फिटनेस पाहून त्या नक्कीच जगतील असे वाटते.' तर दुसऱ्याने, 'हा व्हिडिओ पाहून मला जगण्यास बळ मिळाले. आजीबाई नक्कीच आणखीन १०० वर्ष जगतील.' सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असून, युजर्स या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेण्ट्चा वर्षाव करीत आहे.