Join us  

१०१ वर्षांच्या आजीबाई सांगतात भरपूर आणि आनंदी जगायचं तर फक्त ३ सोप्या गोष्टी करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2024 2:59 PM

101 Year old Women influencer shared the secrets to her longer life : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर मिल्ड्रेड किर्शबॉम या १०१ वर्षांच्या असून, त्या अजूनही फिट आहेत

आजकाल कमी वयात लोकांना विविध आजार ग्रासतात. पण असे का होते? पूर्वी लोकं १०० - १५० वर्ष आरामात जगायचे. मग आता कमी वयात लोकांना आजारांनी का घेरलं आहे? दीर्घायुष्य मिळवण्यासाठी लोकं जीवनशैलीकडे लक्ष देतात. पण जीवनशैलीकडे दुर्लक्ष केल्याने कमी वयात गंभीर आजारांचा धोका, केस-स्किनच्या निगडीत समस्या वाढतात (Social Viral).

बरेच तज्ज्ञ  दीर्घायुष्य जगण्यासाठी जीवनशैलीत बदल, आहारावर लक्ष, यासह काही गोष्टीत बदल करणं गरजेचं आहे असं सांगतात (Health Care). दीर्घायुष्य (Life Long) हवं असेल तर, आपण फक्त तीन गोष्टींची काळजी घ्यायला हवी, असा मोलाचा सल्ला १०१ वर्षांच्या आजीबाई अर्थात इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर मिल्ड्रेड किर्शबॉम यांनी दिला आहे(101 Year old Women influencer shared the secrets to her longer life).

मिल्ड्रेड किर्शबॉमचा तरुणांना मोलाचा सल्ला

वयाची शंभरी गाठल्यानंतर  मिल्ड्रेड किर्शबॉम यांनी एक पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाचे नाव 'मिल्ड्रेड माइंड्स' असे असून, यामध्ये त्यांनी दीर्घायुष्य जगण्याचे काही सिक्रेट्स शेअर केले आहेत. या ३ टिप्सचा आयुष्यात समावेश केल्याने आपल्याला दीर्घायुष्य जगण्यास मदत होईल. कोणते आहेत त्या ३ गोल्डन रुल्स पाहूयात.

उन्हाळ्यात पचनसंस्था कमकुवत होते? रामदेव बाबा सांगतात ६ सोपे बदल; पचेल अन्न-राहाल निरोगी

दीर्घायुष्य जगण्यासाठी फॉलो करा ३ गोल्डन रुल्स

सतत रागावू नका

मिल्ड्रेडच्या म्हणण्यानुसार, तिची नेहमी आपल्या नवऱ्यासोबत भांडणं होत. परंतु, त्यांनी कधी रागराग केला नाही. नवऱ्याने नेहमी शांत राहून, भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. भांडण झाल्यानंतर त्यांच्या नवऱ्याने गैरसमज सोडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे नात्यात भांडणं कमी आणि प्रेम जास्त निर्माण झाले. शिवाय नकारात्मक विचार मनामध्ये येत नाही. स्ट्रेस फ्री राहिल्याने आपण सकारात्माक विचाराने जगतो.

हसत राहा

मिल्ड्रेड म्हणते, की दुखी राहण्यात अर्थ नाही. त्यामुळे माणसाने नेहमी हसत-खेळत जगावे. हसण्याला निमित्त शोधू नका. कायम हसत राहा. कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका.

किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी रोज किती ग्लास पाणी प्यावे? पाणी प्यायल्याने धोका टळतो?

चालत राहा

मिल्ड्रेड सांगते, प्रवास आणि चालल्याने माणसाचे आयुष्य वाढते. बरेचचे वृद्ध व्यक्ती प्रवास करण्यास घाबरतात. जे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे नवी जागा, नव्या गोष्टी शोधत राहा, पाहा. आनंदाने आयुष्य जगा. प्रवास केल्याने नवी माणसं भेटतात. ज्यामुळे ज्ञानात भर, आनंदी राहण्यास कारण आणि मनसोक्त जगण्यास प्रोत्साहन मिळते.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल