Lokmat Sakhi >Social Viral > कचरा वेचणाऱ्या महिला बनल्या करोडपती ! वर्गणी काढून घेतलं लॉटरीचं तिकिट आणि नशिब पालटलं..

कचरा वेचणाऱ्या महिला बनल्या करोडपती ! वर्गणी काढून घेतलं लॉटरीचं तिकिट आणि नशिब पालटलं..

11 sanitation workers in Kerala jointly win Rs 10 crore jackpot, say they’ll continue in their jobs : एखाद्याचं नशीब कसं आणि कधी पालटेल हे सांगता येत नाही, नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या ११ महिला सदस्यांनी मान्सून बंपर लॉटरीत तब्बल १० कोटी रुपये जिंकले आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2023 05:18 PM2023-07-29T17:18:14+5:302023-07-29T17:29:31+5:30

11 sanitation workers in Kerala jointly win Rs 10 crore jackpot, say they’ll continue in their jobs : एखाद्याचं नशीब कसं आणि कधी पालटेल हे सांगता येत नाही, नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या ११ महिला सदस्यांनी मान्सून बंपर लॉटरीत तब्बल १० कोटी रुपये जिंकले आहेत.

11 Kerala women pool in to buy Rs 250 lottery ticket, hit Rs 10 crore jackpot. | कचरा वेचणाऱ्या महिला बनल्या करोडपती ! वर्गणी काढून घेतलं लॉटरीचं तिकिट आणि नशिब पालटलं..

कचरा वेचणाऱ्या महिला बनल्या करोडपती ! वर्गणी काढून घेतलं लॉटरीचं तिकिट आणि नशिब पालटलं..

"देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के" अशी म्हण आपल्याकडे अतिशय लोकप्रिय आहे. एखाद्याकडे काहीच गोष्टी नसताना तो देवाकडे अनेकवेळा हव्या त्या गोष्टी मागून बघतो... परंतु देव जेव्हा त्या व्यक्तीला देतो तेव्हा दुपटीने देतो. भले उशिरा का होईना ती वस्तू देवाच्या कृपेने मिळतेच. अशा काही घटना पाहिल्या की, आपला त्यावर विश्वासच बसत नाही. अशा घटना पाहून त्या व्यक्तीचे नशीबच पालटले असे आपण म्हणतो. लॉटरी म्हटलं तर एक प्रकारचा जुगार किंवा नशीब पालटण्याची संधी. अशीच काहीशी घटना केरळमधील कचरा वेचणाऱ्या महिला कामगारांसोबत घडली आहे. 

केरळमधील मलप्पुरमच्या परप्पानंगडी नगरपालिकामध्ये काम करणाऱ्या ११ महिला मागील दोन ते अडीच वर्षांपासून आपलं घर चालवण्यासाठी घरा-घरातून आणि कार्यालयांमधून नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत. परंतु आता या महिला कर्मचाऱ्यांचे नशीबच पालटले आहे. नेमकं या महिलांसोबत अशी कोणती घटना घडली आहे ते पाहूयात(11 Kerala women pool in to buy Rs 250 lottery ticket, hit Rs 10 crore jackpot).

नेमकी घटना काय आहे ? 

नगरपालिकेच्या सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ११ मेहनती, कामात अतिशय प्रमाणिक असलेल्या महिलांनी एकत्र मिळून २५० रुपयांचे लॉटरीचे तिकीट विकत घेतलं होतं. त्यांना याच तिकीटावर तब्बल १० कोटींची लॉटरी लागल्याचे समोर येत आहे. ११ महिलांनी लॉटरी जिंकली असून त्यांना या  जॅकपॉटने कोट्याधीश बनवलं आहे. परप्पानंगडी येथील मूळ रहिवासी असलेल्या पार्वती या महिलेने सांगितलं की, त्यांना कोणतीही आशा नव्हती की त्या लॉटरी जिंकतील. कारण त्यांनी स्वत:च्या पैशाने विकत घेतलेले हे चौथं लॉटरीचं तिकीट होतं. बुधवारपर्यंत त्यांना आपण पुन्हा जिंकलो नसल्याने तिकीटाच्या पैशांचं नुकसान झाल्याचं वाटलं. पण दुपारी त्या कामावरुन घरी परतल्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना आपण तिकीट खरेदी केलं होतं का? असा सवाल केला, कारण त्यांना एका व्यक्तीने फोन करुन तुमच्या तिकीटावर बक्षीस लागल्याचं सांगितलं होतं. नगरपालिकेच्या सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ११ मेहनती, कामात अतिशय प्रमाणिक असलेल्या महिलांनी एकत्र मिळून २५० रुपयांचं लॉटरीचं तिकीट विकत घेतलं होतं. २५० रुपयांचं तिकीट खरेदी करण्यासाठी ११ महिलांपैकी नऊ जणींनी प्रत्येकी २५ रुपये जमा केले होते आणि इतर दोघींनी प्रत्येकी १२.५ रुपये लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी दिले होते.

उत्तरप्रदेशात बायका म्हणाल्या आता बास ! 'ग्रीन आर्मी' शिकवतेय बायकांना छळणाऱ्यांना धडा...

घसघशीत पगार, कार्पोरेट जॉब, ब्राइट करिअर ‘तिनं’ सोडलं आणि.. करिअरचं वाटोळं झालं की भलं?

लॉटरीच तिकीट लागूनही या महिलांचा प्रामाणिकपणा अजूनही कायम... 

या ११ महिलांपैकी अनेक महिला पैशांच्या आर्थिक समस्येचा सामना करत आहेत. यापैकी अनेक महिला अशा आहेत, ज्या पैसे वाचवण्यासाठी आपल्या घरापासून ते नगरपालिकेपर्यंत लांबचा पल्ला पायी चालत जातात. या महिलांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. जॅकपॉट जिंकणाऱ्या महिलांनी सांगितलं, की लॉटरी लागली असली तरी आम्ही आमचं कचरा वेचण्याचं काम करत राहू. लॉटरीच्या पैशांचा वापर त्या घर बांधण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि आधी घेतलेलं कर्ज चुकवण्यासाठी करणार असल्याचं म्हणाल्या. 

गरोदरपणात ‘तिने’ केला १४ देशांचा प्रवास, वर्षाच्या बाळाला घेऊनही फिरतेय एकटी जगभर, कारण..

योग्य व्यक्तीच्या हातांत पडलं लॉटरीच तिकीट... 

पंजाब नॅशनल बँकेच्या परप्पानंगडी शाखेने लॉटरीचं तिकीट या महिलांच्या हाती सुपूर्द केले आहे. परप्पानंगडी नगरपालिकेचे अध्यक्ष उस्मान ए यांनी सांगितलं, की लॉटरीचं तिकीट खरेदी करणाऱ्या सर्व लोकांमध्ये नशीबाने सर्वात योग्य व्यक्तींची साथ दिली आहे. कारण या सर्व स्त्रिया परिस्थितीशी लढत असून आपलं काम करण्यासाठी धडपडणाऱ्या आहेत. त्या नेहमीच त्यांच्या कामाबाबत प्रामाणिक होत्या आणि त्यामुळे नशिबाने त्यांनी साथ दिली, असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केलं आहे. पी. पार्वती, के लीला, एमपी राधा, एम शीजा, के चंद्रिका, ई बिंदू, कार्तियायिनी, के शोभा, सी बेबी, सी कुट्टीमालु आणि पी लक्ष्मी या महिलांनी लॉटरीच तिकीट जिंकलं आहे.

Web Title: 11 Kerala women pool in to buy Rs 250 lottery ticket, hit Rs 10 crore jackpot.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.