Lokmat Sakhi >Social Viral > ११ वर्षांची मुलगी आईनस्टाईनपेक्षा हुशार, ऑटिझम असूनही झाली इंजिनिअर

११ वर्षांची मुलगी आईनस्टाईनपेक्षा हुशार, ऑटिझम असूनही झाली इंजिनिअर

11 year old girl diagnosed with autism has higher iq than Einstein Adhara Perez Sanchez : मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या या मुलीबाबत सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2023 06:17 PM2023-05-09T18:17:41+5:302023-05-09T19:12:59+5:30

11 year old girl diagnosed with autism has higher iq than Einstein Adhara Perez Sanchez : मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या या मुलीबाबत सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे.

11 year old girl diagnosed with autism has higher iq than Einstein Adhara Perez Sanchez :11 year old girl smarter than Einstein, despite autism became an engineer | ११ वर्षांची मुलगी आईनस्टाईनपेक्षा हुशार, ऑटिझम असूनही झाली इंजिनिअर

११ वर्षांची मुलगी आईनस्टाईनपेक्षा हुशार, ऑटिझम असूनही झाली इंजिनिअर

तिचे वय अवघे ११ वर्षांचे, त्यातही तिला ऑटीझमसारख्या आजाराने ग्रासलेले. पण ही मुलगी मागे हटली नाही, शिकत राहिली. विशेष म्हणजे तिची बुद्धिमत्ता इतकी जास्त होती की तिचा बुद्ध्यांक अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षाही जास्त असल्याचे समजते. बुद्धांक इतका जास्त असल्याने या मुलीने वयाच्या ११ व्या वर्षीच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. तिचे नाव आहे. अधारा पेरेझ सांचेझ (Adhara Perez Sanchez). मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या या मुलीबाबत सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. तिचा बुद्धांक १६२ असून यामध्ये तिने इतक्या जागतिक स्तरावरील संशोधकांना मागे टाकले आहे. अल्बर्ट आईनस्टाीन आणि स्टीफन यांचा बुद्ध्यांक १६० होता (11 year old girl diagnosed with autism has higher iq than Einstein). 

(Image : Google)
(Image : Google)

अधारा ३ वर्षाची असतानाच ऑटिझमचे निदान झाले. वयानुसार विकसित होत नसल्याने  सामाजिक संवाद साधणे अवघड जाते. अशाप्रकारचा आजार असलेल्या अधाराला शाळेतील मुलामुलींनी बरेच चिडवले आणि त्रासही द्यायला सुरुवात केली. यामुळे अधारा शाळेत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. या कारणासाठी मनोचिकित्सकांकडे गेल्यावर त्यांनी अधाराला टॅलेंट केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तिची आई तिला याठिकाणी घेऊन आली आणि इथे केलेल्या चाचण्यांमध्ये अधाराचा बुद्धांक तिच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा खूप जास्त असल्याचे समजले. त्यामुळे दुर्मिळ कौशल्य असलेल्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा असलेल्या ठिकाणी शिक्षण घेण्यास ती पात्र असल्याचे समोर आले. 

(Image : Google)
(Image : Google)

वयाच्या ८ व्या वर्षी अधाराचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर तिने ‘डोन्ट गिव्ह अप’ नावाचे एक पुस्तकही लिहीले. मेक्सिकोमधील प्रभावशाली शंभर महिलांच्या यादित तिचा समावेश झाला आहे. मेक्सिकोमधील टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून तिने गणितातील विशेष औद्योगिक अभियांत्रिकी आणि सिस्टीम इंजिनिअरींगची पदवी वयाच्या ११ व्या वर्षी प्राप्त केली. भविष्यात तिला नासामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले.  


 

Web Title: 11 year old girl diagnosed with autism has higher iq than Einstein Adhara Perez Sanchez :11 year old girl smarter than Einstein, despite autism became an engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.