आपल्यात एक म्हण नेहमीच वापरण्यात येते, ''उम्र का तजुर्बा बोलता है'', म्हणजेच वयातील अनुभव हा बोलतो. जस जसं वय वाढतं तस तसं आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडतात. ठेच खात नव नवीन गोष्टी आपण शिकत असतो. आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्ती आयुष्यात योग्य सल्ला देत राहतात. काय योग्य काय अयोग्य याची कल्पना देतात. असाच एक सल्ला ११५ वर्षीय मारिया ब्रोनी एस मुरेरा या वृद्ध महिलेने लोकांना दिला आहे. ही महिला स्पेनमध्ये राहत असून, त्या स्पेनमधल्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा किताब बहाल केला आहे.
११५ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी १९१८ - १९ची फ्लूची साथ, १९३६ - ३९मध्ये चालेलं सिव्हील वॉर आणि कोरोना व्हायरस या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत, त्यांनी या सगळ्यांवर मात करत जीवन जगले आहे. त्यांनी लोकांसाठी सुखी जीवन जगण्याचा एक मंत्र सांगितला आहे. तो मंत्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
मारिया यांच्या म्हणण्यानुसार आयुष्यात टॉक्सिक लोकांपासून लांब राहिले पाहिजे. त्यांनी वर्षाच्या सुरुवातीला ट्विट करत आपले म्हणणे मांडले होते, त्यांनी ट्विटमध्ये लिहले की, "शिस्त, शांतता, कुटुंब आणि मित्रांसोबत चांगले संबंध, निसर्गाशी संपर्क, भावनिक स्थिरता, भरपूर सकारात्मकता आणि टॉक्सिक लोकांपासून दूर राहणे महत्वाचे आहे. मला वाटते मी भाग्यवान आहे मी इतके वर्ष जगले. चला एकत्र जीवनाचा आनंद घेऊया'' सध्या हे ट्विट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
खरं तर, जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती फ्रांसीसी नन सिस्टर आंद्रे आहे. त्याचं वय ११८ होते. मात्र, त्यांचे १७ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. यानंतर जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा किताब मारिया ब्रोनी एस मुरेरा या स्पॅनिश महिलेला देण्यात आला. पहिले महायुद्ध सुरू होण्याच्या ७ वर्षे आधी ४ मार्च १९०७ रोजी मारियाचा जन्म मेक्सिकोमध्ये झाला होता. त्यानंतर त्या सॅन फ्रान्सिस्कोला रहायला गेल्या.
एका महिन्यानंतर त्या ११६ वर्षांच्या होतील. मारियाला ३ मुले आहेत, यापैकी एकाचं वय ८६ आहे. त्यांच्या ११ नातवंडांपैकी सर्वांत मोठ्याचं वय आहे ६० आहे. मारियांना १३ पतवंडंही आहेत.