जगभरात विविध ठिकाणी नेहमीच उत्खनन सुरू असतं. उत्खननात मिळालेल्या पुरातन वस्तू म्हणजे संस्कृती, परंपरा यांचा मोठा ठेवाच.. असाच ठेवा सध्या इंग्लंडमध्ये सापडला असून त्याची जगभर चर्चा सुरू आहे. Museum of London Archaeology यांच्यावतीने सेंट्रल इंग्लंड भागात नुकतेच उत्खनन करण्यात आले. या उत्खननात सोन्याचा एक दागिना (gold necklace with many precious stones) सापडला असून हा दागिना अंदाजे १३०० वर्षे (1300 years old gold necklace ) तरी जुना असावा, असा प्राथमिक अहवाल इंग्लंडच्या (England) पुरातत्व खात्याकडून देण्यात आला आहे. अर्थात त्यावर अजून भरपूर संशोधन करण्यात येणार असल्याचंही शास्त्रज्ञांनी सांगितलं.
कसा आहे हा दागिना?उत्खननात जो दागिना सापडला आहे ते एक प्रकारचं नेकलेस म्हणजेच गळ्यात घालण्याचाच दागिना असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
देसी गर्ल प्रियांका चोप्राची मोठी भरारी, प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान.. मोठ्या जिद्दीची कहाणी..
हा दागिना सोन्याचा असून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची महागडी, दुर्मिळ रत्न जडविण्यात आली आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांनी या दागिन्याला once-in-a-lifetime असे नाव दिले आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते हा दागिना इ. पु. ६३०- ६७० या काळातला आहे. या नेकलेसला अनेक छोटे- छोटे पदकं असून त्यावर सोने, गार्नेट, काही महागडी रत्ने लावून तयार केलेले आहे. तसेच मध्यभागी असणारे पेंडंट चौकोनी आकाराचे असून त्यावरही बारीक काम करण्यात आले आहे.
या दागिन्याची बऱ्याच ठिकाणी झीज झाली असून तो दागिना मुळ स्वरुपात कसा दिसत असेल, याचं एक कल्पनाचित्रही अभ्यासकांनी प्रसिद्ध केलं आहे.
हिवाळ्यात खायलाच हवी आवळ्याची चटपटीत चटणी! चवीला भारी आणि करायला सोपी, बघा रेसिपी
या दागिन्याविषयी बोलताना Museum of London Archaeology चे सुपरवायझर बेन्स बॅलाझ म्हणाले की ज्या काळी सोन्याचा नुकताच शोध लागला होता, त्यावेळचा हा दागिना असावा. पण सध्यातरी हा दागिना किती जुना आहे आणि तो त्याच्यासोबत कोणकोणत्या नवनविन गोष्टींचा उलगडा करणारा ठरणार आहे, याविषयी काही सांगता येत नाही.