उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले की, घरामध्ये झुरळांची फौज पाहायला मिळते (Cockroaches). कॉकरोज व्यतिरिक्त मुंग्या, पाली आणि उंदीर देखील घरभर पसरतात. त्यातल्या त्यात झुरळांचा वावर जास्त असतो (Kitchen Tips). किचन सिंक, किचनच्या एखाद्या कोपऱ्यात, बेडरूम तर कधी - कधी हॉलमध्ये झुरळं आपलं घर तयार करतात (Cleaning Tips).
झुरळांचा हा उच्छाद उन्हाळ्यात नाकी नऊ आणतो. झुरळांचा बंदोबस्त करायचं असेल तर, आपण केमिकल उत्पादनांचा वापर करतो. पण केमिकल उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा, आपण घरगुती उपायांचा वापर करूनही झुरळांना घरातून पळवून लावू शकता. बेकिंग सोडा आणि लवंगाचा सोपा उपाय झुरळांना घरातून पळवून लावतील(2 DIY Home Remedies for Cockroaches Control in Kitchen).
बेकिंग सोडा आणि साखर
झुरळांना पळवून लावण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि साखरेचा वापर करू शकता. बेकिंग सोडा आणि साखर शक्यतो प्रत्येक घरात असते. याच्या वापराने आपण बॉल्स तयार करू शकता.
पोटात नुसती आग? गॅसेसचा त्रास? उन्हाळ्यात हे ५ जादूई पदार्थ खा, पोटाला मिळेल गारवा
यासाठी एका बाऊलमध्ये समप्रमाणात बेकिंग सोडा आणि पिठीसाखर घालून मिक्स करा. तयार मिश्रणाचे बॉल्स तयार करा. हे बॉल्स ज्याठिकाणी झुरळांचा जास्त वावर आहे, त्या ठिकाणी बॉल्स ठेवा. बेकिंग सोडा आणि साखरेच्या उग्र वासामुळे कॉकरोच पळ काढतील.
सावधान! तुम्ही प्लास्टिकचा तांदूळ तर खात नाही ना? '४' टिप्स, प्लास्टिक तांदूळ ' असा ' ओळख
लवंग
लवंगाचा वापर स्वयंपाकात होतो. याच्या वापराने आपण झुरळांना पळवून लावू शकता. यासाठी ज्याठिकाणी झुरळांचा जास्त वावर आहे, त्या ठिकाणी लवंग ठेवा, किंवा लवंगाचं पाणी शिंपडा. लवंगाच्या उग्र गंधामुळे झुरळं पल काढतील.