स्वयंपाक घरातलं सिंक म्हणजे अशी जागा जिथे प्रत्येकीचं रोज काम पडतं. फळं, भाज्या, धान्य असं काय- काय आपण तिथे धूत असतो. त्यामुळे मग बऱ्याचदा त्यात काही अन्नाचे कण अडकतात. पाईप आतल्या बाजुने व्यवस्थित स्वच्छ झाला नाही तर मग हळूहळू पाण्याचा निचरा कमी वेगात होऊ लागतो आणि मग शेवटी पाणी जातच नाही. त्यामुळे मग सिंक तुंबून जातं. ऐन गडबडीत असं काही झालं तर खूपच मनस्ताप होतो (How to unclog kitchen sink in marathi). प्लंबरसाठी शोधाशोध करायलाही वेळ नसतो. त्यामुळेच मग अशावेळी तातडीने हे काही उपाय करून पाहा. यामुळे सिंक मोकळं होऊन पाणी वाहून जाण्यास मदत होईल. (Cleaning Tips For Kitchen Sink)
किचन सिंक तुंबले असेल तर काय उपाय करावे?
१. उकळतं पाणी
तुंबलेलं सिंक मोकळं करण्याचा सोपा उपाय म्हणजे उकळतं पाणी टाकणे. हा उपाय करण्यासाठी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळलं की हळूहळू करून पाणी सिंकमध्ये ओता.
हिरड्या ठणकतात- सूज येऊन खूप दुखतात? ५ घरगुती उपाय करा- हिरड्यांचं दुखणं लगेच कमी
पाणी ओतलं की काही सेकंदाचा गॅप जाऊ द्या. त्यानंतर पुन्हा पाणी टाका. यामुळे सिंकमध्ये अडकलेली घाण मोकळी होण्यास मदत होईल.
२. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
हा एक सोपा आणि अतिशय परिणामकारक उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी अर्धा ते एक कप व्हिनेगर सिंकमध्ये ओता.
त्यानंतर तेवढ्याच प्रमाणात बेकिंग सोडा घ्या आणि तो ही सिंकमध्ये टाका. यानंतर १० ते १५ मिनिटांनी त्यावर गरम पाणी ओता. यामुळे पाईपमधली सगळी चिकट, तेलकट घाण मोकळी होईल.