हल्ली खिडक्यांना लावण्यात येणाऱ्या पडद्यांमध्येही (Designer Curtains) विविध डिझाईन आणि प्रकार पाहायला मिळत आहे (Curtains Clean). हल्ली रिंग्सच्या पडद्यांचा ट्रेण्ड आहे (Cleaning Tips). शिवाय या पडद्यांना विविध आकर्षक असे डिझाईन असतात (Diwali 2024). हे दिसायला सुंदर असतात. आपल्या भिंतींना लावलेला रंग आणि त्यावर शोभेल असे पडदे मार्केटमध्ये बरेच उपलब्ध आहेत. पण पडद्यांविषयी सर्वात कठीण काम म्हणजे, त्याचे रिंग्स काढून धुणे.
महागडे पडदे धुताना आपण बराच विचार करतो. पडद्यांचा रंग निघू नये, रिंग्स तुटून खराब होऊ नये, याची काळजी आपण घेतो. बरेच जण वॉशिंग मशीनमध्ये पडदे न धुता, हाताने पडदे धुतात. कारण वॉशिंग मशीनमध्ये पडदे धुतल्याने रिंग्स तुटतात. ज्यामुळे आपल्याला बाजारातून नवीन पडदे विकत आणावे लागतात. जर पडदे रिंग्स खराब होऊन तुटू नये, असे वाटत असेल तर, काही टिप्स लक्षात ठेवा. रिंग्स न काढताही आपण पडदे धुवू शकता(2 Easy Curtain Cleaning and Care Tips).
८ पदार्थ खा - उडालेली झोप, सतत थकवा आणि चिडचिड जादू झाल्यासारखे प्रॉब्लम होतील गायब
रिंग्स न काढता पडदे कसे धुवायचे?
- रिंग्स न काढता पडदे धुता येऊ शकते का? हा प्रश्न साहजिक अनेकांच्या मनात आला असेल. कारण रिंग्स काढताना बऱ्याचदा तुटतात. किंवा रिंग्स काढण्याचं काम फार वेळखाऊ वाटतं.
- जर आपल्याला रिंग्स न काढता पडदे धुवायचे असतील तर, सर्वात आधी, एक दोरी घ्या आणि सर्व हुक एकत्र करा आणि त्यांना दोरीने बांधा. यामुळे वॉशिंग मशीनमध्ये फिरताना हुक किंवा रिंग्स तुटणार नाही. शिवाय आवाजही होणार नाही.
- वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी पडदे टाकण्यापूर्वी, आधी डिटर्जेंटच्या पाण्यात पडदे काही वेळासाठी भिजत ठेवा. नंतर वॉशिंग मशीनमध्येपाणी घाला, त्यात भिजलेले पडदे घाला. १० - १५ मिनिटासाठी फिरवून घ्या. त्यातील घाण पाणी बाहेर काढा, चांगले पाणी टाकून पुन्हा १० मिनिटांसाठी फिरवून घ्या.
- २ वेळा स्वच्छ पाण्यात पडदे धुतल्याने, पडदे नव्यासारखे दिसतील. नंतर पडदे पाण्यात पिळून घ्या. किंवा डायरेक्ट वाळत घाला. शेवटी रिंग्सला जोडून ठेवणारी दोरी कापून घ्या. अशा प्रकारे दोरी न काढता, रिंग्स खराब न होता, पडदे स्वच्छ धुवून निघतील.
हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी
- पडदे धुण्याची दुसरी पद्धत म्हणजे, एक काठी घ्या. त्या काठीला पडदा अडकवा. पडद्याचे सगळे रिंग जवळजवळ करून घ्या. आता ही काठी मशिनवर आडवी ठेवा. अशा पद्धतीने पडद्याचा खालचा भाग मशिनमध्ये जाईल आणि रिंग मात्र वरच्या काठीलाच अडकलेले राहतील. आणि पडदे स्वच्छ धुवून निघतील.
- बऱ्याचदा हुक किंवा रिंग्सला गंज पकडते. रिंग्स धुताना खराब होतात. गंजलेल्या रिंग्समुळे पडद्याचे कापडही खराब होते. असं होऊ नये, म्हणून पडदे धुतल्यानंतर वाळत घालताना, रिंग्सची बाजू उलटी ठेवा. आणि वाळत घाला. यामुळे पडद्यांना गंज लागणार नाही.