Lokmat Sakhi >Social Viral > दुधाच्या-पाण्याच्या बाटल्यांना कुबट वास येतो? खराब बाटल्या आतून स्वच्छ करण्याच्या २ सोप्या ट्रिक्स...

दुधाच्या-पाण्याच्या बाटल्यांना कुबट वास येतो? खराब बाटल्या आतून स्वच्छ करण्याच्या २ सोप्या ट्रिक्स...

2 Easy Tricks for cleaning water bottles : सतत वापरली जाणारी ही बाटली आपल्याकडून नीट साफ केली जात नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2023 12:16 PM2023-11-24T12:16:23+5:302023-11-24T12:22:35+5:30

2 Easy Tricks for cleaning water bottles : सतत वापरली जाणारी ही बाटली आपल्याकडून नीट साफ केली जात नाही.

2 Easy Tricks for cleaning water bottles : Do milk-water bottles smell musty? 2 Easy Tricks to Clean Bottles Inside... | दुधाच्या-पाण्याच्या बाटल्यांना कुबट वास येतो? खराब बाटल्या आतून स्वच्छ करण्याच्या २ सोप्या ट्रिक्स...

दुधाच्या-पाण्याच्या बाटल्यांना कुबट वास येतो? खराब बाटल्या आतून स्वच्छ करण्याच्या २ सोप्या ट्रिक्स...

लहान बाळांसाठी आपण दुधाची बाटली वापरतो. मूल अगदी ३ वर्षाचे होईपर्यंत अनेक जण दुधासाठी बाटली देतात. इतकेच नाही तर मुलांना शाळेला, पाळणाघरात नाहीतर कोणत्याही क्लासला जाण्यासाठीही आपण पाण्याची बाटली सोबत देतो. इतकेच काय आपणही पाण्यासाठी बाटली वापरतो. अनेकदा घरातही फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी किंवा पाहुण्यांना देण्यासाठी बाटल्यांचा वापर केला जातो. यामध्ये अगदी साध्या प्लास्टीकपासून, स्टीलच्या, पितळ्याच्या अशा विविवध प्रकारच्या बाटल्या असतात. पाणी पिण्यासाठी बाटली सोयीची असल्याने आपण सर्रास त्यांचा वापर करतो.  बाटल्या बाहेरुन साफ करणे सोपे असते. पण निमुळत्या आणि उंच असल्याने त्या आतून साफ करणे अतिशय अवघड असते (2 Easy Tricks for cleaning water bottles).

सतत पाणी किंवा दूध यांसारखे काही ना काही यात असल्याने त्या आतून चिकट होतात. पण त्या आतून घासायच्या कशा असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यामुळे या बाटल्या आतून साफ न होता तशाच चिकट राहतात. पण सतत वापरली जाणारी ही बाटली आपल्याकडून नीट साफ केली जात नाही. त्याच त्याच बाटलीत परत पाणी भरुन पिणे आरोग्यासाठी चांगले नसते. मात्र आपल्याकडे दुसरा पर्याय नसल्याने आपण कधी एखाद्या लांब ब्रशने किंवा साबणाचे पाणी घालून त्या साफ करण्याचा प्रयत्न करतो. पण अशाप्रकारे बाटल्या साफ केल्यास त्या म्हणाव्या तशा साफ होतातच असं नाही. मग बाटल्या आतून नीट साफ होण्यासाठी नेमकं काय करायचं पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. बाटलीमध्ये १ चमचा बेकींग सोडा आणि पाणी घालून ठेवायचे. हे मिश्रण जोरजोरात हलवायचे आणि रात्रभर किंवा काही तास बाटलीत तसेच ठेवायचे.  दुसऱ्या दिवशी बाटल्या साध्या पाण्याने धुवून ठेवायच्या. बाटल्यांचा चिकटपणा, त्यांना येणारा वास पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल. बेकींग सोडा नैसर्गिक क्लिंजरप्रमाणे काम करत असल्याने साफसफाईच्या बऱ्याच कामांमध्ये आपण त्याचा उपयोग करु शकतो. अशाप्रकारे कोणतेही वेगळ्या पद्धतीचे ब्रश न वापरता, जास्तीचे कष्ट न घेता आपण बाटल्या अगदी सहज साफ करु शकतो.

२. व्हिनेगर हेही नैसर्गिक क्लिंजर असून रात्रभर पाण्यात व्हिनेगर घालून हे पाणी बाटलीत घालून ठेवावे. त्यानंतर सकाळी बाटल्या गरम पाण्याने धुवाव्यात. व्हिनेगरमुळे बाटल्यांना दुधाचा किंवा अन्य कसला कुबट वास येत असेल तर तो जाण्यास मदत होते. व्हिनेजरमध्ये असणारे असिड बाटल्यांचा वास जाण्यास फायदेशीर असल्याने त्याचा बाटल्या स्वच्छ करण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो.  


 

Web Title: 2 Easy Tricks for cleaning water bottles : Do milk-water bottles smell musty? 2 Easy Tricks to Clean Bottles Inside...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.