सकाळ असो किंवा संध्याकाळी, दोन्ही वेळेस चहा प्रत्येकाला लागतो (Cleaning Tips). भारतात पाण्यानंतर सर्वाधिक प्यायले जाणारे पेय म्हणजे चहा आहे. चहा करण्यासाठी फार वस्तूंची आवश्यकता नसून, एक टोप, एक गाळणी, चहा पावडर, साखर आणि दुधाचा वापर होतो. पण चहा तयार झाल्यानंतर महत्वाची असते गाळणी (Kitchen Tips). चहा गाळून काढण्यासाठी गाळणी हवीच. पण बऱ्याचदा गाळणी अस्वच्छ होते, किंवा काळीकुट्ट होते. चहाची गाळणी आपण दररोज साफ करतो. तरी पण ती काळीकुट्ट का होते?
याचे कारण म्हणजे गाळणीत अडकलेली दुधाची साय आणि बारीक चहापत्ती. या दोघांच्या मिश्रणाने त्याचे रूपांतर काळ्याकुट्ट मळात होतो. गाळणीत अडकलेली ही घाण सहजा सहजी साफ करता येत नाही. जर आपल्याला काळीकुट्ट चहाची गाळणी घासूनही स्वच्छ करता येत नसेल तर, एका ट्रिकचा वापर करून पाहा. काही मिनिटात न घासता चहाची गाळणी क्लिन होईल(2 easy ways to clean tea strainer/ tea infuser).
न घासता चहाची गाळणी स्वच्छ कशी करायची?
- जर आपल्या घरातली स्टीलची गाळणी काळीकुट्ट झाली असेल तर, एका ट्रिकचा वापर करून पाहा. यासाठी गॅस चालू करा. फ्लेम मिडीयम ठेवा.
- गाळणी गॅस फ्लेमवर ठेवा, व दोन्ही बाजूने फिरवत राहा. यामुळे गाळणीच्या लहान छिद्रांमध्ये अडकलेली घाण जळून जाईल.
अरे हे काय? लघवीचे डाग असलेली जीन्स पॅन्ट कोण विकते? किंमत ऐकून चकित व्हाल, ही कसली फॅशन
- काही वेळानंतर टूथब्रशच्या मदतीने त्याला साफ करा आणि पाण्याने स्वच्छ करून घ्या.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याच्या वापरानेही आपण चहाची गाळणी स्वच्छ करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे बेकिंग सोडा घाला आणि मिक्स करा. नंतर या पाण्यात चहाची गाळणी ३ ते ४ तासांसाठी भिजत ठेवा. यानंतर, ब्रशच्या मदतीने घासून पाण्याने स्वच्छ करा.