आपण मोठ्या हौशीने महागडं फर्निचर विकत घेतो. सुरुवातीला त्याची खूप काळजी घेतो. पण नंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष होतं. हळूहळू दुर्लक्ष करणं वाढत गेलं आणि आपण त्याच्या वापराबाबत निष्काळजी झालो, तर मग मात्र त्याला वाळवी (valvi kida) लागायला सुरुवात होते (Cleaning Tips for furniture) . वाळवीचा किडा एकदा ते पोखरायला लागला की मग ती किड वाढत जाते आणि वाळवी आटोक्यात आणणं खूप कठीण होऊन जातं. म्हणूनच फर्निचरची योग्य पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी कोणत्या २ गोष्टी करणं गरजेचं आहे, याविषयी ही खास माहिती एकदा वाचा (2 Simple Remedies to protect home wooden furniture from the termites).... त्यामुळे वाळवी तर लागणार नाहीच, पण फर्निचर वर्षानुवर्षे अगदी नव्यासारखं चमकेल. (How to take care of wooden furniture?)
फर्निचरला वाळवी लागू नये म्हणून २ उपाय
१. कडुलिंब
कडुलिंबामध्ये ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल घटक भरपूर प्रमाणात असतात, हे तर आपण जाणतोच. त्यामुळेच तर धान्यामध्येही किड लगू नये, म्हणून आपण कडुलिंबाची पाने टाकून ठेवतो.
आता याच कडुलिंबाचा उपयोग लाकडी फर्निचरला वाळवी लागू नये, म्हणून कसा करायचा ते पाहूया. त्यासाठी बाजारात कडुलिंबाचं तेल मिळतं. हे तेल विकत आणा आणि कापसाच्या बोळ्याने ते तेल फर्निचरच्या अडगळीच्या ठिकाणी नियमितपणे लावत जा. ते तेल स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही फर्निचरवर स्प्रे ही करू शकता.
२. व्हिनेगर आणि लिंबाचा रस
फर्निचरला वाळवी लागू नये, म्हणून हा एक चांगला उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी व्हिनेगर आणि लिंबाचा रस सम प्रमाणात घ्यावा. तो एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि नियमितपणे फर्निचरवर मारत जा.
गरबा खेळायला जाणार असाल तर फक्त २५० रुपयांची ही किट आधी विकत घ्या! ऐनवेळी गडबड होणारच नाही..
खासकरून फर्निचरचा भिंतीशी जोडलेला जो भाग असतो किंवा ज्या ठिकाणी फर्निचरवर आपण हॅण्डल लावलेलं असतं, अशा भेगांमध्ये हा स्प्रे मारावा.