Join us  

२ स्मार्ट झटपट ट्रिक्स, प्लास्टिक पिशवीची घाला नाजूक -लहानशी घडी, शेकडो पिशव्या सहज साठवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 5:18 PM

2 Smart Ways to Store Your Plastic Bags : प्लास्टिक पिशव्यांचा घरात अस्ताव्यस्त ढीग पडतो, पसाराच पसारा. त्यावर हे २ सोपे उपाय, घडी घाला स्मार्ट...

प्लस्टिकच्या पिशव्यांची समस्या देशापुढील सर्वात मिठी समस्या असली तरीही आपण काही प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणे सोडून देत नाही. काही खरेदी करू आणायचे म्हटले किंवा साधी भाजी देखील विकत आणायची म्हटलं की आपण दुकादाराकडे लगेच प्लॅस्टिकची पिशवी मागून घेतो. या प्लॅस्टिकच्या पिशव्या आपल्यापैकी बऱ्याच गृहिणी घरी साचवून ठेवतात. या पिशव्यांचा पुढे काही कामासाठी वापर करता येईल अशा हेतूने आपण या पिशव्या साठवून ठेवतो. आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा ढिग जमा झालेला दिसतो. या जमा झालेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. यातील काही पिशव्या या पातळ प्लॅस्टिकच्या असतात तर काही जाड प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात. प्रत्येक पिशवीच्या क्वालिटीनुसार आपण त्याचा पुढे कसा वापर करायचा हे ठरवतो. 

काहीवेळा या प्लस्टिकच्या पिशव्या साठवता साठवता इतक्या मोठ्या प्रमाणात साचतात की त्या व्यवस्थित ठेवायच्या कशा असा प्रश्न आपल्याला पडतो. मग या पिशव्या आपण काहीवेळा किचनमधील भांड्यांच्या रॅकमध्ये किंवा कपड्यांच्या कपाटात जिथे जागा मिळेल तिथे कोंबून ठेवून देतो. या पिशव्या हव्या तशा कुठेही अस्ताव्यस्त ठेवल्याने जेव्हा गरज पडेल तेव्हा एकही पिशवी वेळेवर सापडत नाही. अशावेळी जर आपण या पिशव्यांचा ढिग न रचता त्या पिशव्या व्यवस्थित घडी करून ठेवल्या तर त्या दिसतानाही व्यवस्थित दिसतात व वेळेवर लगेच वापरायला मिळतात(2 Smart Quick Ways To Fold and Store Plastic Bags).

पिशव्यांच्या घडी घालून ठेवायच्या दोन सोप्या पद्धती :- 

१. रोल अँड ट्विस्ट :- ज्या प्लास्टिक पिशव्यांच्या दोन्ही बाजुंना हातात धरण्यासाठी बंध असतात, अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण एका सपाट पृष्ठ भागावर ठेवून त्या हाताने हलक्याच दाबून व्यवस्थित करून घ्याव्यात. यानंतर या पिशवीच्या दोन्ही बाजूंची बरोबर मधोमध घडी घालूंन घ्यावी. घडी घातल्यानंतर या पिशवीच्या खालच्या भागापासून पिशवी गोल गोल गुंडाळत वरच्या हॅण्डलच्या दिशेने गोल गोल गुंडाळत न्यावी. त्यानंतर त्या दोन्ही पिशवीचे हॅण्डलना थोडा पीळ देऊन गुंडाळी केली पिशवी त्यात नीट अडकवून घ्यावी. 

खूप आंबट झाले म्हणून दही टाकून देता? १ सोपा उपाय, दही संपेल आणि किचनही होईल चकाचक...

मळके सॉफ्ट टॉईज धुण्याच्या सोप्या ४ पद्धती, सॉफ्ट टॉईज होतील स्वच्छ, चमकदार...

फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो, फ्रिजमधून पाणी गळू लागते ? ७ सोपे उपाय, कुलिंगही होईल चांगले...

२. पिरॅमिड पद्धत :- ज्या प्लॅस्टिकच्या शॉपिंग बॅगेचे हॅण्डल हे पिशवीच्या बरोबर मधल्या भागात असतात, अशा प्लॅस्टिक बॅग स्टोअर करण्यासाठी आपण पिरॅमिड पद्धतीचा वापर करू शकतो. सर्वप्रथम ही प्लॅस्टिकची शॉपिंग बॅग एका सपाट पृष्ठ भागावर अंथरून हातांनी हलकेच दाबून व्यवस्थित करून घ्यावी. त्यानंतर या पिशवीच्या तळभागाची एक घडी घालावी, ही घडी पिशवीच्या वरच्या दिशेने बरोबर मध्यभागी येईल असे बघावे. त्यानंतर तशीच अजून एक घडी घालावी. असे केल्यानंतर पिशवीची एक आयताकृती लांब पट्टी तयार होईल. त्यानंतर या लांब पट्टीच्या डावीकडून व उजवीकडून एक घडी अशी घालावी कि ती पिशवीच्या बरोबर मधोमध येईल. त्यानंतर आपल्याला पिशवीचा चौकोनी आकार तयार झालेला दिसेल या चौकोनी आकाराला बरोबर मधोमध एक घडी घालून छोटा त्रिकोण करून घ्यावा. आता आपल्याला एक त्रिकोणी घडी घातलेली एक पिशवी मिळेल त्यानंतर या पिशवीचे हॅण्डल थोडे ट्विस्ट करून त्यात ही पिशवीची त्रिकोणी घडी नीट अडकवून ठेवावी. 

अशाप्रकारे आपण रोल अँड ट्विस्ट व पिरॅमिड पद्धतीचा वापर करून झटपट पिशव्यांच्या घड्या घालून त्या व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो. यामुळे वेळेवर पटकन पिशव्या मिळतील तसेच पिशव्यांचा साचणार ढिग देखील कमी होईल.

टॅग्स :सोशल व्हायरल