Lokmat Sakhi >Social Viral > स्वस्तातलं फर्निचरही दिसेल महागडं आणि क्लासी, २ साेपे उपाय, कमी पैशात बदलून टाका घराचा लूक

स्वस्तातलं फर्निचरही दिसेल महागडं आणि क्लासी, २ साेपे उपाय, कमी पैशात बदलून टाका घराचा लूक

How To Make Your Cheap Furniture Look More Expensive And Classy: स्वस्तातलं फर्निचर एकदम क्लासी, हायफाय दिसण्यासाठी हे २ सोपे आणि स्वस्तातले उपाय करून पाहा. घराचा लूक बदलण्यास नक्कीच मदत होईल. (how to give new look to old furniture?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2024 04:02 PM2024-01-29T16:02:54+5:302024-01-29T16:03:38+5:30

How To Make Your Cheap Furniture Look More Expensive And Classy: स्वस्तातलं फर्निचर एकदम क्लासी, हायफाय दिसण्यासाठी हे २ सोपे आणि स्वस्तातले उपाय करून पाहा. घराचा लूक बदलण्यास नक्कीच मदत होईल. (how to give new look to old furniture?)

2 Tips to make your cheap furniture look more expensive and classy, how to give new look to old furniture? | स्वस्तातलं फर्निचरही दिसेल महागडं आणि क्लासी, २ साेपे उपाय, कमी पैशात बदलून टाका घराचा लूक

स्वस्तातलं फर्निचरही दिसेल महागडं आणि क्लासी, २ साेपे उपाय, कमी पैशात बदलून टाका घराचा लूक

Highlightsस्वस्तातल्या फर्निचरचा लूक बदलायचा असेल तर त्यासाठी २ अगदी सोपे उपाय करता येतात.

घर म्हटलं की त्यात भरपूर पसारा, खूप सामान असतंच. आता हे सामान ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर घेतो. कधी हे फर्निचर सामान ठेवण्यासाठी म्हणून असतं तर कधी घराच्या सजावटीसाठी आपण ते घेतो. फर्निचर घेण्याचा उद्देश कोणताही असला तरी ते घरात छान दिसावं, असं आपल्याला वाटतंच. ब्रॅण्डेड दुकानातून उत्तम दर्जाचं फर्निचर घेण्यासाठी खूप पैसे लागतात. प्रत्येकवेळी तेवढं बजेट नसतं, त्यामुळे मग आपण स्वस्तात मस्त फर्निचर घेऊन येतो. हे स्वस्तातलं फर्निचर काही दिवसांनी आणखी जुनाट दिसू लागतं (2 Tips to make your cheap furniture look more expensive and classy). म्हणूनच अशा या स्वस्तातल्या फर्निचरचा लूक बदलायचा असेल तर त्यासाठी २ अगदी सोपे उपाय करता येतात.(how to give new look to old furniture?)

स्वस्तातल्या फर्निचरचा लूक बदलण्यासाठी उपाय

 

फर्निचरला रंग द्या

स्वस्तातलं फर्निचर खराब दिसण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे त्या फर्निचरचा उडलेला रंग. काही लाकडी वस्तूंचा रंग लवकर उडतो. त्यामुळे मग त्या जुनाट दिसू लागतात.

लग्नसराईसाठी ठुशी घ्यायची? बघा १ ग्रॅम ठुशीचे पारंपरिक तसेच लेटेस्ट फॅशनचे सुंदर डिझाईन्स

अशावेळी फर्निचरला रंग दिला तर नक्कीच त्याचा लूक बदलू शकतो. फर्निचरला रंग देण्यासाठी मेटॅलिक, हायग्लॉस रंगाचा वापर करा. यामुळे तुमचं स्वस्तातलं फर्निचरही एकदम क्लासी आणि हायफाय दिसू लागेल. 

 

वॉल पेपर

फर्निचरला लावण्यासाठी आजकाल बाजारात खूप वेगवेगळ्य प्रकारचे, रंगांचे, डिझाईन्सचे वॉलपेपर मिळतात.

चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स- व्हाईटहेड्स खूप वाढले? टोमॅटो फेशियल करा, चेहरा होईल स्वच्छ- चमकदार

हे वॉलपेपर तुम्ही तुमच्या फर्निचरला चिटकवल्यावर त्यांचा लूक पुर्णपणे बदलून जातो. फर्निचरच्या लूकमध्ये एवढा फरक पडतो की ते जुनंच आहे, हे सांगूनही अनेकांना विश्वास बसत नाही. यासाठी फक्त जिथे वॉलपेपर चिटकवायचा आहे, तो भाग गुळगुळीत असावा. हल्ली तर अनेक जण भिंतीलाही रंग देण्याऐवजी वॉलपेपरच लावतात. 

 

Web Title: 2 Tips to make your cheap furniture look more expensive and classy, how to give new look to old furniture?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.