Join us  

व्हॅक्यूम क्लिनर न वापरता फॅब्रिकचा सोफा स्वच्छ करण्याचे २ उपाय; १० मिनिटांत सोफा चकाचक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2024 5:42 PM

How To Clean Fabric Sofa Without Using Vacuum Cleaner: फॅब्रिकचा सोफा असेल तर तो वरचेवर स्वच्छ करता येत नाही. म्हणूनच हे काही सोपे उपाय पाहून घ्या. ते नक्कीच तुमच्या कामी येऊ शकतात. गालिचा स्वच्छ करण्यासाठीही तुम्ही हे उपाय करू शकता. (best home hacks to clean fabric sofa)

ठळक मुद्देसोफा खूपच मळालेला असेल तर किंवा एरवीही स्वच्छतेसाठी दर २- ३ महिन्यांतून एकदा तुम्ही या पद्धतीने तो स्वच्छ केला पाहिजे.

सोफ्यांमध्ये हल्ली बरेच प्रकार उपलब्ध आहेत. त्यातच फॅब्रिकचा सोफाही बाजारात मिळतो आणि त्याचा लूक खूप देखणा, दिमाखदार असतो. तसा सोफा हॉलमध्ये ठेवल्याने आपला हॉलही अधिकच आकर्षक दिसू लागतो. म्हूणनच अनेक लोक अगदी हौशीने फॅब्रिकचा सोफा खरेदी करतात. पण तो वरचेवर पाण्याने धुवून स्वच्छ करता येत नाही, ही त्याची सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यावर आपण कव्हर टाकले तरी सुद्धा तो सोफा काही काळानंतर मळालेला दिसतो. खराब होतो. घरात व्हॅक्युम क्लिनर नसेल तर तो सोफा स्वच्छ करणे कठीण जाते (how to clean fabric sofa without using vaccum cleaner?). म्हणूनच फॅब्रिकचा सोफा स्वच्छ करण्यासाठी या काही सोप्या ट्रिक्स बघून घ्या.(best home hacks to clean fabric sofa)

फॅब्रिकचा सोफा कसा स्वच्छ करावा?

 

१. कव्हरचा वापर

फॅब्रिकचा सोफा जास्त दिवस मेंटेन ठेवण्यासाठी त्यावर कव्हर घातलेच पाहिजेत. यामुळे सोफा खूप घाण होत नाही. पण तरीही तुमचा सोफा मळाला असेल, खराब झाला असेल तर हे काही सोपे उपाय तुम्ही करू शकता. 

लॅपटॉप- कम्प्युटरवर सतत काम करून मान आखडून गेली? ३ सोपे व्यायाम, लगेचच बरं वाटेल!

२. ब्रश वापरून स्वच्छता

फॅब्रिकचा सोफा स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी कपडे धुण्याचा मऊ ब्रिसल्स असणारा ब्रश घ्या आणि तो सोफ्यावरून फिरवून त्यामध्ये अडकलेली धुळ, घाण किंवा इतर कचरा काढून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही दर आठवड्याला तो स्वच्छ केल्यास त्यास जास्त धूळ अडकून बसणार नाही.

 

३. लिंबू आणि बेकिंग सोडा

सोफा खूपच मळालेला असेल तर किंवा एरवीही स्वच्छतेसाठी दर २- ३ महिन्यांतून एकदा तुम्ही या पद्धतीने तो स्वच्छ केला पाहिजे. त्यासाठी एका भांड्यात २ टेबलस्पून लिक्विड डिश वॉश घ्या.

नवरात्रीला देवीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येणारे ८ गोड पदार्थ- कमी वेळेत करा चवदार नैवेद्य..

त्यामध्ये १ टेबलस्पून बेकिंग सोडा घालून त्यात एका लिंबाचा रस पिळा. या मिश्रणात २ ग्लास गरम पाणी टाका. आता या मिश्रणामध्ये एखादे नॅपकिन बुडवा. ते पिळून घ्या आणि त्याने सोफा पुसून काढा. त्यादरम्यान काही काळ खोलीचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवा, फॅन सुरू ठेवा जेणेकरून सोफा लवकर वाळण्यास मदत होईल. 

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडी