Join us  

पाण्याच्या बाटल्या आतून पिवळ्या, बाहेरून चिकट झाल्या? चमचाभर मिठाचा उपाय; बाटली होईल स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2024 12:58 PM

2 ways to clean drinking water bottles at home : पाण्याच्या बाटल्यात आतून घाण साचली, हिरवी दिसायला लागली तर वेळीच स्वच्छ करा..

उन्हाळा सुरु होताच आपण शरीराला थंडावा देणारे पदार्थ आणि थंड पाणी पीत राहतो (Cleaning Tips). पाणी थंड व्हावे म्हणून, आपण प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी साठवून फ्रिजमध्ये ठेवतो (Bottle Clean). प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या असतात. तहान लागल्यावर आपण फ्रिजमधली बाटली काढतो आणि पाणी पितो. पण पाण्याने भरलेली बाटली जेवढी बाहेरून स्वच्छ दिसते, तेवढीच आतून देखील स्वच्छ असते का? बाटल्या अधिक काळ वापरल्यास, त्याच्या आतमध्ये पिवळट डाग दिसू लागतात.

शिवाय अनेक प्रकारच्या जीवाणू निर्माण होतात, ज्या पाण्यासोबत थेट पोटात जातात. यामुळे पोटाचे विकार वाढतात. म्हणून वेळोवेळी प्लास्टिक बाटल्या स्वच्छ करणं गरजेचं आहे. बाटल्या स्वच्छ करणं आपल्याला किचकट काम वाटत असेल तर, २ सोप्या पद्धतीने स्वच्छ करा. बाटल्या काही मिनिटात नव्यासारख्या दिसतील(2 ways to clean drinking water bottles at home).

दही आंबट तर कधी पातळ होते? दही लावताना लक्षात ठेवा १ ट्रिक, घट्टसर कवडी दह्याची गॅरंटी

५ मिनिटात प्लास्टिक बाटल्या करा स्वच्छ

- कमी वेळात बॉटल स्वच्छ करण्यासाठी, भरड मिठाचा वापर करा. भरड मीठ आपल्याला सहज बाजारात मिळेल. यासाठी बाटलीत पाणी आणि थोडे भरड मीठ घाला. नंतर बॉटलचं झाकण लावा, आणि शेक करा. आपण जितक्या वेळा शेक कराल, तितक्या कमी वेळात बॉटल स्वच्छ होईल. शिवाय प्लास्टिकच्या बाटलीचा वासही निघून जाईल.

बेकिंग सोड्याचा करा वापर

डाळ-तांदूळ भिजवायची गरजच नाही, करा १० मिनिटांत सुपरसॉफ्ट इडली; उन्हाळ्यात खा हलकेफुलके

- बेकिंग सोड्याच्या वापरानेही आपण बॉटल स्वच्छ करू शकता. यासाठी बाटलीमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा घाला, त्यानंतर कोमट पाण्याने बाटली भरा. आता बाटली कॅपने बंद करा व बाटली वर - खाली हलवा. यानंतर झाकण काढा आणि काही वेळ असेच राहू द्या. काही वेळानंतर बाटली रिकामी करा आणि स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे बाटलीतून येणारा दुर्गंधही निघेल, शिवाय चकचकीत दिसेल.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलसमर स्पेशलसोशल मीडिया