सोशल मीडियावर एका चिमुरडीचा व्हिडिओ एका वेगळ्याच कारणासाठी व्हायरल होत आहे. आपल्या गरोदर आईची काळजी घेणारी चिमुरडी पाहून तुम्हालाही तिचं कौचुक वाटल्याशिवाय राहणार नाही. ती तिच्या आईला खाली पडलेली प्लेटही उचलू देत नाही. हा प्रसंग लहान असला तरी यातून खूप काही शिकण्यासारखं आहे आतापर्यंत ११ लाखांपेक्षा अधिक व्हिव्हजसह हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, मुलगी तिच्या गरोदर आईची किती काळजी करते. (2 year old knows exactly how to take care of her pregnant mother viral video will melt your heart)
हे दाखवण्यासाठी ख्रिस्मा एक छोटासा प्रयोग करते. तिची मुलगी कालेना काय करते हे पाहण्यासाठी ती प्लेट खाली ठेवते. आईला प्लेट खाली पडल्याचे दिसताच ती उचलायला मदत करण्यासाठी घाईघाईने स्वयंपाकघरात जाते. तिची आई गरोदर आहे आणि ती खाली वाकू शकत नाही याची तिला पुरेपूर जाणीव आहे.
त्यामुळे, ती तिच्या टॅब्लेटमध्ये व्यस्त असतानाही आईकडे धावत गेली. 'मी लहान मुलांमधला जॉकपॉट मिळवला. तिच्याजवळ असताना गर्भधारणा १०० पट सोपी आहे.' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. कमेंट्स विभागात लहान मुलीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. विशेषत: आयपॅड घेऊन आरामशीर झोपलेली असतानाही तिला आईची खूप काळजी वाटते. हे नेटिझन्सना खूप आवडले.