Lokmat Sakhi >Social Viral > ‘२०२१ हे वर्ष फार वाईट गेलं..!’ बिल गेट्स सांगतात घटस्फोटानंतर बदललेल्या जगण्याची, सुन्या घराची कहाणी

‘२०२१ हे वर्ष फार वाईट गेलं..!’ बिल गेट्स सांगतात घटस्फोटानंतर बदललेल्या जगण्याची, सुन्या घराची कहाणी

घर रिकामे झाल्यामुळे एकटे वाटत असल्याची भावना बिल गेट्स यांनी व्यक्त केली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 11:27 AM2021-12-11T11:27:59+5:302021-12-11T14:05:53+5:30

घर रिकामे झाल्यामुळे एकटे वाटत असल्याची भावना बिल गेट्स यांनी व्यक्त केली...

2021 is very bad .. Bill Gates tells the story after divorce | ‘२०२१ हे वर्ष फार वाईट गेलं..!’ बिल गेट्स सांगतात घटस्फोटानंतर बदललेल्या जगण्याची, सुन्या घराची कहाणी

‘२०२१ हे वर्ष फार वाईट गेलं..!’ बिल गेट्स सांगतात घटस्फोटानंतर बदललेल्या जगण्याची, सुन्या घराची कहाणी

Highlightsअब्जाधिश असूनही एकटेपणाच्या दु:खात बिल गेट्स झाले हळवेमुलांशिवाय घर शांत वाटते आणि त्यांची आठवणही येते..

आपल्या सगळ्यांसाठीच २०२१ हे वर्ष म्हणावे तितके चांगले नव्हते. कोरोना नावाचा राक्षस, त्यातही अनेकांच्या नोकऱ्या जाणे अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे हे वर्ष फारसे चांगले नव्हते. आपल्याला वाटते आपल्याच आयुष्यात अडचणी असतात. पण प्रचंड पैसे असलेल्या जागतिक स्तरावरील व्यक्तींनाही अडचणी असू शकतात. प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधिश असलेले बिल गेट्स यांच्यासाठीही हे वर्ष चांगले नव्हते. आता याचे नेमके कारण बिल गेट्स यांनी नुकताच एक ब्लॉग लिहीला, त्यामध्ये स्पष्ट केले आहे. ते म्हणतात ‘२०२१ हे वर्ष वैयक्तिकरित्या आपल्यासाठी दुख:द होते’. याचे कारण म्हणजे २७ वर्षांच्या सहवासानंतर बिल गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच यांचा मे २०२१ मध्ये घटस्फोट झाला, त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये ते प्रत्यक्षात वेगळे झाले. 

(Image : Google)
(Image : Google)

गत वर्षाचा आढावा घेताना ६६ वर्षांचे बिल गेट्स म्हणतात, ‘सर्वात वेगळे आणि अवघड वर्ष’. आपल्या गेट्सनोट्सब्लॉगमध्ये ते लिहीतात, कोरोनाच्या साथीमुळे आपल्याला एकटेपणा आला आणि त्यातच घरही रिकामे होते. मी सध्या ज्या गोष्टींवर काम करत आहे त्या माझ्यासाठी  सर्वात चांगल्या गोष्टी आहेत, मात्र दुसरीकडे माझे वैयक्तिक आयुष्य गेल्या वर्षात विखुरले. आमच्या घरगुती गोष्टींबाबत विशेषत: आमच्या घटस्फोटाबाबत जाणून घेण्यात अनेकांना रस आहे. घटस्फोटासारखा किंवा कोणताही बदल स्वीकारणे वाटते तेवढे सोपे नाही. पण या आव्हानात्मक काळात माझे प्रियजन विशेषत: माझी मुले अतिशय लवचिक असल्याने मी त्यांच्या वागण्यामुळे प्रभावित झालो आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

मेलिंडा आणि मी मिळून स्थापन केलेल्या फाऊंडेशनसाठी आम्ही सोबत काम करणार आहोत, असेही गेट्स यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र मागचे पूर्ण वर्ष माझ्यासाठी उदास होते हे मी नाकारणार नाही, असेही ते म्हणाले. बिल गेटेस आणि मेलिंडा यांना तीन मुले आहेत. त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले असून इतर दोन जण त्यांच्यासोबतच राहत होते. आपल्या पोस्टमध्ये गेट्स म्हणतात, घटस्फोटानंतर या मुलांनीही घर सोडल्यामुळे आपले घर आता एकदम शांत झाले आहे. दिवसभर आजुबाजूला असणारी मुले आता घरात नसल्यामुळे घर शांत वाटते. पुस्तके वाचणे किंवा आपले काम करणे यावर लक्ष केंद्रित केले तरी आपण मुलांना मिस करत असल्याचे ते या नोटमध्ये सांगतात. बिल गेट्स यांची आताची संपत्ती १३८ डॉलर इतकी असल्याचे सांगितले जाते. या नोटसमध्ये बिल गेटस आपल्या व्यवसायाशी संबंधित आणि इतरही अनेक विषयांवर आपले म्हणणे मांडतात. 

Web Title: 2021 is very bad .. Bill Gates tells the story after divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.