काही लोकांना खाण्याची प्रचंड आवड असते (Overeating). पण यामुळे लठ्ठपणा, किंवा गंभीर आजारांचा धोका वाढतो. अन्न खाल्ल्याने आपल्याला नवीन जीवन मिळते. शरीराला आणि आरोग्याला पौष्टीक घटक मिळतात (Live streaming). पण अति तेथे माती होतच असते (Social Viral). अनेकांना खाण्याची इतकी सवय असते, की त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटतो.
अन्न मिळविण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात, आणि अति प्रमाणात खाल्ल्यानेच त्यांचा मृत्यू होतो. अशीच एक घटना चीनमध्ये घडली. एका २४ वर्षीय महिलेचा अतिप्रमाणात खाण्यामुळे मृत्यू झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती त्यावेळी लाइव्ह स्ट्रीमिंग करीत होती. खाण्यामुळे महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला?(24-year-old woman dies from overeating during live streaming, ate 10 hours a day).
अनेक वर्षे सुखी संसार करुनही जोडपी घटस्फोट का घेतात? ग्रे डिव्होर्स हे काय नवीनच प्रकरण..
अति खाण्यामुळे महिलेचा मृत्यू
ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, पॅन शिओटिंग या चीनी महिलेचा मृत्यू जास्त खाण्याच्या सवयीमुळे झाला. खरंतर, सोशल मिडीयावर लाईक्स आणि पैसे कमवण्याच्या नादात तिचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय.
कानात मळ झाला म्हणून कान कोरता? पाहा, कानात मळ झाला तर काय करायचे..
रिपोर्ट्सनुसार, प्रोफेशनल मुकबंगर बनण्याची कल्पना महिलेच्या मनात आली. मुकबंग स्ट्रीमर्स हे खरंतर भरपूर अन्न खातानाचे व्हिडीओ बनवून शेअर करतात. यामुळे त्यांना चाहत्यांकडून भरपूर भेटवस्तू आणि पैसे मिळत असत. त्यानंतर तिनेही तसे प्रयत्न करण्याचे ठरवले. सुरुवातीला तिला फॉलोअर्स मिळवण्यात खूप अडचणी आल्या. पण नंतर तिला यश मिळाले. पण यामुळे तिचे वजन ३०० किलोपर्यंत वाढले.
स्ट्रीमिंगदरम्यान १० किलो खायची अन्न
पॅन दिवसातून किमान १० तास सतत खात असे. म्हणजेच प्रत्येक स्ट्रीमिंगदरम्यान, १० किलोग्रॅमपेक्षा जास्त अन्न खात असे. पण यामुळे पोटाला अन्न व्यवस्थित पचलं नाही. तिचा मृत्यू कसा झाला याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण शवविच्छेदनादरम्यान तिच्या शरीराची तपासणी केली असता, तिच्या पोटात बरेच अन्न आढळले; जे पचले नव्हते.