बऱ्याचदा स्वयंपाक बनवताना अन्नपदार्थ भांड्यांच्या तळाशी चिकटून बसतात. अशावेळी आपण हे पदार्थ भांडयांना चिकटू नयेत म्हणून त्यात भरपूर तेल घालतो. पदार्थ भांड्यांच्या तळाशी चिकटून राहू नयेत म्हणून आपण तेल वापरतो किंवा चमच्याने पदार्थ वारंवार ढवळत रहातो. काहीवेळा आपण अन्नपदार्थ भांडयांना चिकटू नयेत म्हणून नॉनस्टिक भांड्यांचा देखील वापर करतो. नॉनस्टिक भांड्यांमध्ये अन्नपदार्थ कमी तेलांत, तसेच भांड्यांच्या तळाशी न चिकटता सहजरित्या बनवता येतात. नॉनस्टिक भांडयांना एक वेगळ्या प्रकारचे स्पेशल कोटिंग केलेले असते, यामुळे अन्नपदार्थ भांडयांना चिकटत नाहीत.
नॉनस्टिक भांडयांना असणाऱ्या या वेगळ्या प्रकारच्या स्पेशल कोटिंगमुळेच ही भांडी स्वच्छ करताना विशेष काळजी घ्यावी लागते. नॉनस्टिक भांडयांना स्वच्छ करताना त्यांची विशेष काळजी घेतली नाही तर ती भांडी खराब होतात. अशी भांडी वापरण्यायोग्य न राहता खराब झाल्यामुळे त्यांचा काहीच वापर करता येत नाही. नॉनस्टिक भांडी बाजारांत खूपच महाग किंमतीत विकत मिळतात. अशा महागड्या भांडयांची तितकीच काळजी घ्यावी लागते. नॉनस्टिक भांडी स्वच्छ करताना आपण हमखास काही चुका करतो ज्यामुळे ही भांडी खराब होऊन जास्त काळ टिकत नाहीत. नॉनस्टिक भांड्यांवरील कोटिंग टिकून रहावे व भांडी दिर्घकाळ चांगली नव्यासारखी रहावीत यासाठी हमखास होणाऱ्या चुका लक्षात घेऊन त्यावरील उपाय समजून घेऊयात(3 Common Mistakes To Avoid When Cleaning Nonstick Cookware).
नॉनस्टिक भांडी स्वच्छ करताना होणाऱ्या चुका टाळा :-
चूक १ : नॉनस्टिक भांडी गरम असतानाच पाण्याखाली धुणे.
उपाय :- नॉनस्टिक भांडी गरम असतानाच पाण्याखाली धुणे ही अतिशय चुकीची पद्धत आहे. नॉनस्टिक भांडी लगेच गॅस वरुन उतरवून गरम असतानाच पाण्याखाली धुतल्याने खराब होतात. नॉनस्टिक भांडी गरम असतानाच त्यांना पाण्याने धुतले तर त्यांवरील कोटिंग खराब होऊन ही भांडी वापरण्यायोग्य राहत नाहीत. नॉनस्टिक भांडी गॅसवरुन उतरवून सर्वप्रथम संपूर्णपणे गार होऊ द्यावीत. त्यानंतरच, ही भांडी पाण्याचे स्वच्छ धुवून घ्यावीत.
चूक २ : नॉनस्टिक भांडी धुण्यासाठी हार्श साबण किंवा डिशवॉशचा वापर करणे.
उपाय :- नॉनस्टिक भांडी धुण्यासाठी हार्श साबण किंवा डिशवॉशचा वापर करणे टाळावे. नॉनस्टिक भांडे जसे गार होऊन नॉर्मल रुम टेम्परेचरला येते तेव्हा ते भांडे धुण्यासाठी योग्य आहे असे समजावे. या प्रकारची भांडी स्वच्छ करण्यासाठी माईल्ड डिशवॉश किंवा साबण तसेच हलक्या गरम पाण्याचा वापर करावा. नॉनस्टिक भांड्यांवरचे कोटिंग जाऊ नये, ती बराच काळ टिकावीत यासाठी ही भांडी कायम हलक्या गरम (उकळते गरम पाणी नव्हे) पाण्याने धुवून घ्यावीत.
चूक ३ : नॉनस्टिक भांडी स्वच्छ करण्यासाठी स्क्रबर किंवा तारेच्या घासणीचा वापर करणे.
उपाय :- नॉनस्टिक भांडी स्वच्छ करण्यासाठी स्क्रबर किंवा तारेच्या घासणीचा वापर करु नये. यामुळे भांडी खराब होण्याची शक्यता असते. नॉनस्टिक भांडी जर आपण स्क्रबर किंवा तारेच्या घासणीचा वापर करुन घासली, तर त्यावरचे कोटिंग निघू शकते. अशा भांड्यांवरील कोटिंग निघून गेल्यामुळे हळुहळु या भांड्यांच्या तळाशी अन्नपदार्थ चिकटून बसतात. असे होऊ नये म्हणून, भांड्यांवरील कोटिंग टिकवून ठेवण्यासाठी त्यांना स्क्रबर किंवा तारेच्या घासणीने घासू नये.
नॉनस्टिक भांड्यांची अशी घ्या काळजी :-
१. नॉनस्टिक भांड्यांवरचे कोटिंग टिकविण्यासाठी तेलाचा वापर :- नॉनस्टिक भांड्यांना वारंवार सीजन करण्याची गरज नसते. ही भांडी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर, या भांड्यांत तेलाचे ३ ते ४ थेंब घालून टॉवेल किंवा टिश्यू पेपरने हे तेल संपूर्ण भांड्यांला पसरवून लावावे. असे केल्याने नॉनस्टिक भांड्यांवरचे कोटिंग दिर्घकाळ टिकण्यास मदत होते.
२. बेकिंग सोड्याचा असा करा वापर :- नॉनस्टिक भांड्यांना स्वच्छ करण्यासाठी व त्यांची चमक कायम नव्यासारखी ठेवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. या प्रकारच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना काहीवेळा भांडी जळतात तेव्हा बेकिंग सोडा वापरुन ही भांडी स्वच्छ करावीत. नॉनस्टिक भांडी जळून काळी पडली किंवा करपली तर ती स्वच्छ करण्यासाठी आपण स्क्रबर किंवा तारेच्या घासणीचा वापर करतो. परंतु असे न करता, पाण्यांत १ टेबलस्पून बेकिंग सोडा घालून त्याची घट्टसर पेस्ट तयार करुन घ्यावी. ही पेस्ट मऊ स्पंजच्या मदतीने नॉनस्टिक भांडयांना लावून भांडी स्वच्छ धुवून घ्यावीत. हा उपाय केल्याने जळलेली नॉनस्टिक भांडी परत नव्यासारखी चमकविण्यास मदत होते.