Lokmat Sakhi >Social Viral > बाथरूमच्या टाइल्स बुळबुळीत झाल्या, पिवळे डागही निघत नाहीत? ३ टिप्स; जुन्या टाइल्स चमकतील नव्यासारख्या

बाथरूमच्या टाइल्स बुळबुळीत झाल्या, पिवळे डागही निघत नाहीत? ३ टिप्स; जुन्या टाइल्स चमकतील नव्यासारख्या

3 DIY Techniques to Remove Stains from Bathroom Tiles : बाथरुम स्वच्छ तर हवंच, ते स्वच्छ दिसायलाही हवं. त्यासाठी खास टिप्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 10:00 AM2024-10-12T10:00:30+5:302024-10-12T10:05:02+5:30

3 DIY Techniques to Remove Stains from Bathroom Tiles : बाथरुम स्वच्छ तर हवंच, ते स्वच्छ दिसायलाही हवं. त्यासाठी खास टिप्स.

3 DIY Techniques to Remove Stains from Bathroom Tiles | बाथरूमच्या टाइल्स बुळबुळीत झाल्या, पिवळे डागही निघत नाहीत? ३ टिप्स; जुन्या टाइल्स चमकतील नव्यासारख्या

बाथरूमच्या टाइल्स बुळबुळीत झाल्या, पिवळे डागही निघत नाहीत? ३ टिप्स; जुन्या टाइल्स चमकतील नव्यासारख्या

घरातील बाथरूम स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे (Cleaning Tips). मात्र, घरातील इतर भाग स्वच्छ करण्यापेक्षा जास्त कठीण आहे. शिवाय हे वेळखाऊ काम आहे. लोक सहसा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बाथरूम स्वच्छ करतात (Bathroom). तर काहींना बाथरूम स्वच्छ करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे बाथरूम महिनोमहिने अस्वच्छ असते. बाथरूम अस्वच्छ असल्यावर पिवळट डाग तयार होतात. जे घासूनही जात नाही.

आता दिवाळी हा सण जवळ आला आहे. दिवाळी सण जवळ आल्यानंतर आपण साफ सफाई करतो. संपूर्ण घराची साफसफाई झाल्यानंतर आपण शेवटी बाथरूम स्वच्छ करतो. बाथरूम स्वच्छ करताना, पिवळट टाईल्सचे डाग सहसा लवकर निघत नाही. जर बाथरूमचे टाईल्स घासूनही स्वच्छ होत नसेल तर, काही घरगुती उपाय करून पाहा. मिनिटात टाईल्स स्वच्छ होतील(3 DIY Techniques to Remove Stains from Bathroom Tiles).

सत्तरी पार करणारी रेखा 'या' ट्रेण्डी साड्यांमुळे दिसते तिशीतली; ट्राय करा ७ सुंदर साड्या - मिळेल रिच लूक

मीठ

टाईल्सवर साचलेला पिवळट डाग साफ करण्यासाठी आपण मिठाचा वापर करू शकता. मीठ फक्त पदार्थाची चव वाढवत नसून, याच्या वापराने आपण टाईल्सही स्वच्छ करू शकता. यासाठी टाईल्सवर मीठ शिंपडा. स्क्रबरने टाईल्स घासा. रात्रभर टाईल्सवर मीठ तसेच ठेवा. सकाळी फरशी पाण्याने स्वच्छ करा. मिनिटात टाईल्स स्वच्छ होतील.

भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल

व्हिनेगर

बाथरूमच्या टाईल्स स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. यामुळे टाईल्सवरचे बॅक्टेरियाही नष्ट होतील. टाईल्स स्वच्छ करण्यासाठी एका स्प्रे बाटलीमध्ये पाणी आणि व्हिनेगर समान प्रमाणात मिसळा. नंतर टाईल्सवर स्प्रे करा. काही वेळ तसेच राहू द्या. नंतर स्क्रबरने फरशी घासून घ्या.

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याचा वापर आपण टाईल्स स्वच्छ करण्यासाठी करू शकता. यासाठी एका स्वच्छ स्पंजमध्ये बेकिंग सोडा घ्या आणि टाईल्स घासून काढा. नंतर पाण्याने टाईल्स धुवून घ्या. मिनिटात टाईल्स स्वच्छ होतील. 

Web Title: 3 DIY Techniques to Remove Stains from Bathroom Tiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.