सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे बांगड्या, अंगठ्या अशा वेगवेगळ्या दागदागिन्यांची काढ-घाल होतच असते. त्यात कधी कधी असंही होतं की एखाद्या साडीवर किंवा ड्रेसवर मॅचिंग बांगड्यांचा जुना सेट आपण निवडतो पण त्या बांगड्या थोड्या लहान होतात. पण तरीही ऐनवेळी दुसरा काही पर्याय नसल्याने आपण त्या हातात घालून घेतो. घालताना तर आपण घालतो पण नंतर मात्र त्या हातातून निघता निघत नाहीत. किंवा काही जणींच्या बाबतीत असंही होतं की त्यांच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या कित्येक वर्षे हातातून निघालेल्याच नसतात. हाताचा घेर दिवसेंदिवस वाढत जातो आणि मग त्या बांगड्या काढताना खूप त्रास होतो. अशावेळी हे काही उपाय करून तुम्ही घट्ट झालेल्या बांगड्या काढू शकता..(how to remove bangles stuck in hands?)
हातात घट्ट झालेल्या बांगड्या काढण्यासाठी उपाय
१. अचूक वेळ
अगदी सकाळी- सकाळी तुम्ही हातातून बांगड्या काढण्याचा प्रयत्न कराल तर त्या निघणार नाहीत. कारण सकाळच्या वेळी आपलं अंग म्हणावं तेवढं लवचिक नसतं.
शाकाहारी लोकांना भरपूर प्रोटीन देणारे ६ पदार्थ, महागडे प्रोटीन शेक पिण्याची गरजच नाही
अंग थाेडं फुगलेलंही असतं. म्हणूनच थोडी कामं झाल्यानंतर, अंगात पुरेशी लवचिकता आल्यानंतर बांगडी काढून पाहण्याचा प्रयत्न करा. आंघोळ करून आल्यानंतर बांगडी काढून पाहा. अगदी अलगद निघून येईल.
२. हाताला तेल लावा
हातातून बांगडी काढायची असेल किंवा बोटात फसलेली अंगठी काढायची असेल तर त्या हाताला किंवा बोटाला थोडं तेल लावून चोळा. त्यानंतर हळू हळू बांगडी किंवा अंगठी काढा.
महिलांमध्ये दिसणारी 'ही' ५ लक्षणं सांगतात मॅग्नेशियमची कमतरता- शरीरातलं मॅग्नेशियम वाढवायचं तर....
बांगडी किंवा अंगठी काढताना त्यांना पुढून ओढण्यापेक्षा मागच्या बाजुने जोर देऊन पुढे ढकला. बांगडी, अंगठी लवकर निघेल.
३. साबण वापरा
साबण किंवा शाम्पू वापरून घट्ट झालेली बांगडी, अंगठी अलगदपणे काढता येते. साबण किंवा शाम्पू वापरण्यापुर्वी २ ते ३ मिनिटे हात बांगडी पाण्यात बुडेल अशा पद्धतीने गरम पाण्यात घालून ठेवा.
गरम पाण्यामुळे अंगठी किंवा बांगडीही थोडी सैलसर होण्यास मदत होईल. त्यानंतर मग साबण किंवा शाम्पू लावून त्याच फेस करा आणि बांगडी ओढून काढा.