Lokmat Sakhi >Social Viral > फोडणी उडाल्याने ओट्यावरच्या टाइल्स पिवळ्या-चिकट होतात, ३ उपाय-टाइल्स राहतील कायम स्वच्छ...

फोडणी उडाल्याने ओट्यावरच्या टाइल्स पिवळ्या-चिकट होतात, ३ उपाय-टाइल्स राहतील कायम स्वच्छ...

3 Easy tips to keep kitchen tiles clean : कष्ट वाचावेत आणि टाइल्स जास्त खराबच होऊ नयेत यासाठी काही सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2024 12:04 PM2024-01-12T12:04:08+5:302024-01-12T12:06:19+5:30

3 Easy tips to keep kitchen tiles clean : कष्ट वाचावेत आणि टाइल्स जास्त खराबच होऊ नयेत यासाठी काही सोपे उपाय

3 Easy tips to keep kitchen tiles clean : Tiles on kitchen become yellow-sticky , 3 solutions-tiles will remain clean forever... | फोडणी उडाल्याने ओट्यावरच्या टाइल्स पिवळ्या-चिकट होतात, ३ उपाय-टाइल्स राहतील कायम स्वच्छ...

फोडणी उडाल्याने ओट्यावरच्या टाइल्स पिवळ्या-चिकट होतात, ३ उपाय-टाइल्स राहतील कायम स्वच्छ...

स्वयंपाकघर म्हणजे ज्याठिकाणी सतत राबता असतो. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत याठिकाणी सतत काही ना काही सुरु असतं. रोजच्या स्वयंपाकासोबतच सणवार, पाहुणे अशा सगळ्या गोष्टींमुळे स्वयंपाकघराचा सतत वापर होत असतो. स्वयंपाकघर म्हणजे स्वयंपाक करण्याची जागा इतकेच काम नसून आणलेले सामान व्यवस्थित जागच्या जागी लावून ठेवणे, स्वयंपाकाची तयारी, स्वयंपाक, त्यानंतरची आवराआवर आणि साफसफाई अशा असंख्य गोष्टी महिला याठिकाणी करत असतात. स्वयंपाक करताना ओटा, गॅस शेगडी, टाइल्स, किचन सिंक असे सगळेच खराब होत असते. ते वेळच्या वेळी साफ केले तर स्वच्छ होते. नाहीतर हे डाग साचत जातात आणि मग ते डाग साफ करणं अवघड होऊन जातं (3 Easy tips to keep kitchen tiles clean). 

ओट्यावरच्या टाइल्स साफ करणं इतकं सोपं काम नसतं. विकेंडला त्यासाठी वेगळा वेळ काढून या टाइल्स स्वच्छ घासाव्या लागतात. हे डाग जास्त दिवसांचे असतील तर ते काढण्यासाठी बराच जोर लावावा लागतो. हे कष्ट वाचावेत आणि टाइल्स जास्त खराबच होऊ नयेत यासाठी काही सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत. हे उपाय करणे अगदी सोपे असून लक्षात ठेवून ते केल्यास आपले साफसफाईचे काम नक्कीच वाचू शकते. पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे.  

१. फोडणी करताना लक्षात ठेवा १ गोष्ट

आपण कढई, पातेलं किंवा पॅनमध्ये फोडणी टाकतो. त्यावेळी त्यात मोहरी, जीरं, कडीपत्ता, मिरची, कांदा हे सगळं क्रमाक्रमाने घालत जातो. फोडणी तडतडली की साहजिकच ती उडते आणि मागच्या टाइल्सवर जाऊन त्याचे काही कण याठिकाणी जमा होतात. असं होऊ नये म्हणून फोडणी टाकल्यावर लगेचच त्या कढईवर किंवा भांड्यावर एखादं झाकण ठेवायचं. म्हणजे फोडणी उडाली तरी ती बाहेर न येता या झाकणावर उडते आणि गॅस खराब होण्यापासून वाचतो. हा करायला अगदी सोपा उपाय आहे मात्र हाताला सवय लागेपर्यंत थोडा वेळ जातोच. 

२. किचन प्रोटेक्टर शीट

किचनच्या मागच्या टाइल्सवर किंवा ओट्यावर आणि आणखी आवश्यक त्या ठिकाणी लावण्यासाठी प्रोटेक्टर शीट मिळतात. या शीटस ट्रान्स्परंट असल्याने त्या लावल्यात असे पाहणाऱ्यांना समजत नाही. पण त्यामुळे उडणारे पदार्थ, फोडणी ही त्या शीटवर उडते. हे शीट काही दिवस वापरुन काढून फेकून देता येतात. नंतर पुन्हा नवीन शीट लावायचे. असे केल्याने त्यामागे असणाऱ्या टाइल्स खराब होत नाहीत. या शीटस ऑनलाईनही अतिशय स्वस्तात मिळत असून तुम्ही एकदा त्या नक्की वापरुन पाहायला हव्यात.

(Image : Google)
(Image : Google)

३. फोडणी करण्याची ट्रिक

गॅस शेगडी ओट्यापासून थोडी पुढे राहील असे पाहायचे. तसेच तेल तापल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग फोडणीचे पदार्थ तेलात घालायचे. गॅस बंद असल्याने फोडणी प्रमाणापेक्षा जास्त तडतडत नाही. मग सगळे टाकून झाल्यावर गॅस पुन्हा लावायचा आणि मग हे पदार्थ चांगले परतून घ्यायचे. त्यामुळे गॅस शेगडी, टाइल्स यावर फोडणी आणि पदार्थ उडण्याची शक्यता कमी असते. 

Web Title: 3 Easy tips to keep kitchen tiles clean : Tiles on kitchen become yellow-sticky , 3 solutions-tiles will remain clean forever...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.