Lokmat Sakhi >Social Viral > तव्यावर काळे डाग पडले, तेलकट-चिकट थर साचला ? ३ सोप्या ट्रिक्स, तवा दिसेल नवाकोरा चकचकीत...

तव्यावर काळे डाग पडले, तेलकट-चिकट थर साचला ? ३ सोप्या ट्रिक्स, तवा दिसेल नवाकोरा चकचकीत...

How To Clean Burnt Pans At Home : तव्यावरचे मेणचट थर कितीही घासले तरी निघत नाहीत? त्यासाठीच करुन पाहा ३ सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 10:58 AM2023-07-20T10:58:00+5:302023-07-20T11:17:08+5:30

How To Clean Burnt Pans At Home : तव्यावरचे मेणचट थर कितीही घासले तरी निघत नाहीत? त्यासाठीच करुन पाहा ३ सोपे उपाय...

3 Easy Tricks To Clean Burnt Pans At Home. | तव्यावर काळे डाग पडले, तेलकट-चिकट थर साचला ? ३ सोप्या ट्रिक्स, तवा दिसेल नवाकोरा चकचकीत...

तव्यावर काळे डाग पडले, तेलकट-चिकट थर साचला ? ३ सोप्या ट्रिक्स, तवा दिसेल नवाकोरा चकचकीत...

आपल्या किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी वेगवेगळे तव्यांचे प्रकार वापरतो. लोखंडी, हार्ड अ‍ॅनोडाइझ्ड, अ‍ॅल्युमिनियम, नॉनस्टिक पॅन, ब्लॅक कोटेट तवा, बिड्याचा तवा असे अनेक प्रकारचे पॅन, तवे आपण वापरतो. या काही ठराविक वैशिष्ट असणाऱ्या भांड्यांची तितकीच जास्त स्वच्छता व काळजी घ्यावी लागते. किचनमधील तवा हा सर्वात उपयोगात येणारा भांड्यांपैकी एक आहे. रोजची चपाती किंवा भाकरी बनवण्यासाठी आपण तव्याचा वापर करतो. याशिवाय काही खास पदार्थ फ्राय करायचे असल्यास देखील आपण या तव्याचा वापर करतो. 

तव्याचा वापर रोज होत असला तरीही काहीवेळा आपल्या हातून पदार्थ बनवताना तो करपतो. या करपलेल्या पदार्थाचा काळा व तेलकट थर तव्याला तसाच चिकटतो. हा चिकटलेला थर वेळीच स्वच्छ केला नाही तर त्यावर आणखीन थर साचून तवा खराब तर होतोच आणि वापरण्यायोग्य पण राहत नाही. हा तव्याला चिकटून बसलेला थर काही केल्या निघता निघत नाही. आपण हा तवा रोज जरी घासून स्वच्छ केला तरी त्यावर एक प्रकारचा काळा थर साचून राहतोच. यामुळे त्या तव्यावर पदार्थ बनवणे कठीण जाते तसेच काहीवेळा पदार्थ नीट शिजत नाहीत किंवा त्यांची चव बिघडते. अशावेळी एक सोपी ट्रिक वापरुन आपण हा तवा पूर्वीसारखा स्वच्छ करु शकतो(3 Easy Tricks To Clean Burnt Pans At Home).

तव्यावर साचलेला काळा थर काढून टाकण्यासाठीची एक सोपी ट्रिक... 

१. तव्यावर साचलेला काळा थर काढून घेण्यासाठी सर्वप्रथम त्यावर २ ते ३ टेबलस्पून कोणत्याही प्रकारचा शॅम्पू घालावा. त्यानंतर तव्यावर एक कप गरम पाणी ओतून घ्यावे. यानंतर दिवाळीतील जुना झालेला एखादा मातीचा दिवा घ्यावा. या दिव्याने आता संपूर्ण तवा घासून घ्यावा. तव्यावरील करपलेला काळा थर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत या मिश्रणाने तवा घासून घ्यावा. तवा घासून घेतल्यानंतर, त्यावरील काळा थर संपूर्ण निघून गेल्यानंतर तवा लिक्विड वॉश किंवा नेहमीच्या साबणाने घासून घ्यावा. यामुळे तव्यावर साचलेला काळा थर निघून जाऊन तवा परत पूर्वीसारखा नवीन दिसू लागेल. रोजच्या वापरात येणारा तवा दर आठवड्याला किंवा १५ दिवसांनी पूर्णपणे स्वच्छ करावा. भांडी स्वच्छ आणि बंद ठिकाणी ठेवा. जर आपल्या स्वयंपाकघरात जास्त जागा नसेल तर आपण ही भांडी प्लास्टिक किंवा वर्तमानपत्राने झाकून ठेवू शकता.

स्वयंपाक घरातील चिमणी तेलकट डागाने झाली काळीकुट्ट ? ४ सोपे उपाय... चिमणी चमकेल नव्यासारखी...

बिडाचा तवा विकत तर आणला पण तो ' सिझन ' कसा करायचा? १० टिप्स, वापरायला झटपट तयार...

२. लिंबू आणि बेकिंग सोडाच्या मदतीने आपण तवा घासून काढू शकता. यासाठी १ लिंबू, १ चमचा बेकिंग सोडा आणि गरम पाणी घ्या. एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि गरम पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट नंतर तव्यावर लावून १५ मिनिटं ठेवा.  नंतर लिंबाने तवा घासून गरम पाण्यानं धुवा. याने तवा झटक्यात स्वच्छ होतो.

किचन कॅबिनेट- ट्रॉल्यांची दारं तेलकट-चिकट झाली? २ सोपे उपाय, कॅबिनेट चमकेल नव्यासारखं...

फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो, फ्रिजमधून पाणी गळू लागते ? ७ सोपे उपाय, कुलिंगही होईल चांगले...

३. काळपट पडलेला तवा स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा वापर करा. यासाठी लिंबू, मीठ आणि गरम पाण्याची आवश्यकता आहे. सर्वप्रथम, तवा कागदाच्या सहाय्याने साफ करून घ्या. त्यानंतर मीठ तव्यावर पसरवून घाला. मीठ टाकल्यानंतर १० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर लिंबूचे दोन काप करा. त्या कापाने तवा चांगले घासून काढा. तवा घासल्यावर गरम पाण्याने धुवा. शेवटी नेहमीच्या डिशवॉशनं तवा चांगले घासून काढा. या उपायाने तवा पूर्वीसारखा चमकेल.

Web Title: 3 Easy Tricks To Clean Burnt Pans At Home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.