Join us  

किचनच्या कळकट्ट टाईल्स स्वच्छ करण्याचे ३ सोपे उपाय, कमी वेळात चमकेल किचन ओटा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2023 9:20 AM

3 easy Tricks to clean kitchen Tiles : वेळच्या वेळी हा चिकटपणा साफ केला नाही तर नंतर हा राप वाढत जातो आणि साफ करणे अवघड होऊन बसते.

आपण घर कितीही स्वच्छ ठेवायचं ठरवलं तरी काही ना काही कारणाने ते खराब होतंच.विकेंडला आपण साफसफाईसाठी वेगळा वेळ राखून ठेवतो आणि बारकाईने साफसफाई करतो. याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र घर जास्त घाण होत जातं आणि मग ते साफ करणं अवघड होऊन बसतं. किचन हा साफसफाईमधील एक महत्त्वाचा भाग. याठिकाणच्या टाईल्स साधारणपणे पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या असतात.किचनमध्ये रोज स्वयंपाक करताना पदार्थांच्या वाफेमुळे, पाणी, तेलाची फोडणी किंवा आणखी काही उडाल्याने टाईल्स चिकट होतात (3 easy Tricks to clean kitchen Tiles). 

वेळच्या वेळी हा चिकटपणा साफ केला नाही तर नंतर हा राप वाढत जातो आणि साफ करणे अवघड होऊन बसते. टाईल्सवर चढलेला हा राप आपण बरेचदा साफ करायचा प्रयत्न करतो पण ते डाग जास्त मेंचट असतील तर ते निघत नाहीत. अशावेळी बाजारातले महागडे डिटर्जंट वापरण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास टाईल्स स्वच्छ होण्यास मदत होते. हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे पाहूया...

(Image : Google)

१. व्हिनेगर

व्हिनेगर हा टाइल्सवरील डाग निघण्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय आहे. दोन कप विनेगरमध्ये दोन कप पाणी मिसळा. हे मिश्रण एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरून घ्या काही वेळाने हा स्प्रे स्वयंपाक घरातील चिकट टाइल्सवर मारा. थोडावेळ टाईल्स तशाच ठेवा. नंतर एखाद्या स्वच्छ कापडाच्या मदतीनं हलक्या हाताने टाईल्स स्वच्छ करा. यासाठी जास्त कष्ट न घेता व्हिनेगरमुळे टाईल्सवरचे डाग निघून जाण्यास मदत होईल. 

२. कॉस्टीक सोडा

कास्टीक सोडा घेऊन त्यामध्ये लिक्विड डीश वॉश आणि व्हिनेगर टाकावे.हे सगळे चांगले एकत्र करुन हँड ग्लोव्हजचा वापर करुन ते ते मिक्स करायचे.कास्टीक सोड्याची ही पेस्ट स्क्रबरच्या मदतीने टाइल्सवर लावायची आणि साधारण २० ते ३० मिनीटांसाठी तशीच ठेवायची.साधारण अर्धा तास झाला की स्क्रबर आणि ब्रशच्या मदतीने तुम्ही टाइल्स घासू शकता. सोड्यामुळे चिकटपणा आणि घाण झटपट निघण्यास मदत होईल.ही घाण साफ झाल्यावर डिटर्जंट किंवा लिक्विड डीश वॉशच्या मदतीने या टाइल्स साफ कराव्यात. 

काचेची भांडी फुटली की घरभर काचा पसरतात? हात न लावता लहान-लहान तुकडे पटकन उचलून होतील- १ सोपी ट्रिक

३. बेकींग सोडा 

बेकिंग सोडा ज्याप्रमाणे काही पदार्थांमध्ये वापरला जातो. त्याचप्रमाणे घराच्या स्वच्छतेसाठीही त्याचा चांगला उपयोग होतो. त्यातील एक्सफॉलिएटींग गुणधर्म घराची साफसफाई करण्यासाठी उपयुक्त ठरतात. बेकींग सोडा पाण्यात घालून त्या पाण्याने टाइल्स धुतल्यास त्या चांगल्या साफ होतात. इतकेच नाही तर बेकिंग सोड्यामध्ये लिंबू घातल्यास त्याचा आखी चांगला फायदा होतो. यामुळे फोडणीचे किंवा इतर न जाणारे डाग निघण्यास मदत होते.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्सहोम रेमेडी