Lokmat Sakhi >Social Viral > चहाची गाळणी कितीही घासली तरी काळीकुट्ट-अस्वच्छच दिसते? १ जबरदस्त ट्रिक; मिनिटांत गाळणी चकाचक

चहाची गाळणी कितीही घासली तरी काळीकुट्ट-अस्वच्छच दिसते? १ जबरदस्त ट्रिक; मिनिटांत गाळणी चकाचक

3 easy ways to clean tea strainer/ tea infuser : चहाची गाळणी रोज वापरुन काळीकुट्ट झालीय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2024 02:34 PM2024-10-03T14:34:33+5:302024-10-03T16:27:17+5:30

3 easy ways to clean tea strainer/ tea infuser : चहाची गाळणी रोज वापरुन काळीकुट्ट झालीय?

3 easy ways to clean tea strainer/ tea infuser | चहाची गाळणी कितीही घासली तरी काळीकुट्ट-अस्वच्छच दिसते? १ जबरदस्त ट्रिक; मिनिटांत गाळणी चकाचक

चहाची गाळणी कितीही घासली तरी काळीकुट्ट-अस्वच्छच दिसते? १ जबरदस्त ट्रिक; मिनिटांत गाळणी चकाचक

भारतीय घरांमध्ये निदान २ वेळेस चहा केला जातो (Tea Strainer). दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी चहा हवाच. चहा तयार करण्यासाठी जास्त मेहनत किंवा कमी साहित्याची गरज नाही (Cleaning Tips). कमी साहित्यात चहा तयार केला जातो. चहाचं भांडं आणि चहाच्या गाळणी व्यतिरिक्त कोणत्याही भांड्याचा वापर होत नाही.

मात्र, चहाची गाळणी वारंवार खराब होते. बारीक छिद्रात चहापत्तीचे दाणे अडकतात. ज्यामुळे चहाची गाळणी खराब होते. आणि काळपट दिसू लागते. जर चहाची गाळणी घासूनही अस्वच्छ असेल तर, काही गोष्टींचा वापर करून पाहा. अगदी काही मिनिटात चहाची गाळणी स्वच्छ होईल. शिवाय लवकर खराबही होणार नाही(3 easy ways to clean tea strainer/ tea infuser).

चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी टिप्स

व्हाईट व्हिनेगर

चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी आपण व्हाईट व्हिनेगरचा वापर करून पाहू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये व्हाईट व्हिनेगर घ्या. त्यात चहाची गाळणी ४ तास भिजत ठेवा. ४ तासानंतर घासणीने घासून चहाची गाळणी स्वच्छ करा.

उपवासाचे ९ चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ खा, रेसिपीही झटपट-साबुदाणा खिचडीला पर्याय

लिंबाचा रस

चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी आपण लिंबाचा रसाचा वापर करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये लिंबाचा रस घ्या. त्यात गाळणी भिजत ठेवा. नंतर लिंबाच्या रसाने गाळणी घासून घ्या. या टीपमुळे गाळणी स्वच्छ करा.

चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल

बेकिंग सोडा

बेकिंग पावडर नॅच्युरल क्लिन्झर म्हणून काम करते. याच्या वापराने आपण चहाची गाळणीही स्वच्छ करू शकता. यासाठी एका पॅनमध्ये पाणी गरम करा, नंतर त्यात एक ते दोन चमचे बेकिंग सोडा मिसळा. त्यात घाण झालेली चहाची गाळणी २-३ तास बुडवून ठेवा. नंतर स्क्रबरने गाळणी घासून स्वच्छ करा. 

Web Title: 3 easy ways to clean tea strainer/ tea infuser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.