Join us  

बाथरूममधल्या बादल्यांवर पडलेले पाण्याचे पांढरट, पिवळट डाग काढून टाकण्यासाठी ३ सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2022 7:42 PM

Cleaning Hacks: करून बघा ३ सोपे उपाय, बाथरूममधील डागाळलेल्या बादल्याही चमकतील अगदी नव्यासारख्या...

ठळक मुद्दे३ सोपे घरगुती उपाय. खूप जुन्या आणि खूपच डाग असलेल्या बादल्याही अगदी स्वच्छ, चकाचक होऊन जातील.

बोअरिंगचं पाणी असलं की टॉयलेट- बाथरुममधल्या बादल्या काही दिवसांतच पांढरट पिवळट दिसू लागतात. नव्या आणलेल्या बादल्याही अवघ्या महिना- दोन महिन्यांतच अशा डागाळलेल्या होऊन जातात. आजकाल बहुतांश घरांमध्ये बोअरिंगचेच पाणी आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक घरातल्या महिलेलाच ही समस्या भेडसावते. अशा पांढरट डाग पडलेल्या बादल्या आणि मग वापरायलाही खूपच घाणेरड्या वाटतात. म्हणूनच हे पहा ३ सोपे घरगुती उपाय. खूप जुन्या आणि खूपच डाग असलेल्या बादल्याही अगदी स्वच्छ, चकाचक होऊन जातील.(home remedies for cleaning bathroom buckets and mug)

 

बादल्या- मग यावरचे पांढरट डाग काढण्यासाठी उपाय(white stains on toilet- bathroom buckets)१. लिंबू- सोडा- मीठहे मिश्रण पांढरट, पिवळट झालेल्या बादल्या स्वच्छ करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. हा उपाय करण्यासाठी ५ ते ६ लिंबू घ्या आणि मधोमध चिरा. त्यानंतर हे सगळे लिंबू मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यात १ टेबलस्पून बेकींग सोडा आणि १ टेबलस्पून मीठ टाका. हे सगळे मिश्रण मिक्सरमधून काढा. हा लेप आता ब्रशच्या साहाय्याने बादलीला आतून- बाहेरून लावून घ्या. १० ते १५ मिनिटांनी बादलीवर गरम पाणी शिंपडा आणि तारेच्या घासणीने घासून डाग स्वच्छ करा. लगेचच बादली स्वच्छ दिसेल.

 

२. हार्पिकचा वापरटॉयलेट क्लिनिंगसाठी आपण हार्पिक वापरतोच. तेच आता बादलीसाठी वापरा. ब्रशच्या साहाय्याने बादलीला हार्पिक लावून टाका. त्यानंतर लगेचच तारेच्या घासणीने बादली घासून स्वच्छ करा. बादली खूप स्वच्छ झाल्यासारखी वाटली नाही, तर पुन्हा एकदा हार्पिकचा लेप लावा आणि पुन्हा तारेच्या घासणीने घासा.

 

३. लिंबू आणि सोडापाण्याचे डाग पडून खराब झालेल्या बादल्या स्वच्छ करण्यासाठी हा आणखी एक सोपा उपाय. हा उपाय करण्यासाठी एका भांड्यात २ टेबलस्पून सोडा घ्या. त्यात एका लिंबाचा रस टाका. त्यात थोडे गरम पाणी टाकून त्याची पेस्ट करून घ्या. पेस्ट खूप घट्ट नसावी आणि खूप पातळही नसावी. ही पेस्ट ब्रशच्या मदतीने बादलीला लावा. त्यानंतर एक तासाने बादलीवर गरम पाणी शिंपडा आणि तारेच्या घासणीने घासून बादली स्वच्छ करून घ्या. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडी