Lokmat Sakhi >Social Viral > पंखा पुसूनही डाग तसेच? धुळीने माखलेला पंख स्वच्छ करण्यासाठी १ खास ट्रिक; मिनिटात पंखा स्वच्छ

पंखा पुसूनही डाग तसेच? धुळीने माखलेला पंख स्वच्छ करण्यासाठी १ खास ट्रिक; मिनिटात पंखा स्वच्छ

3 fan cleaning hacks that you should know of : सणावाराला झटपट पंखा स्वच्छ करण्यासाठी १ युक्ती फॉलो करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2024 04:30 PM2024-10-07T16:30:47+5:302024-10-07T16:31:57+5:30

3 fan cleaning hacks that you should know of : सणावाराला झटपट पंखा स्वच्छ करण्यासाठी १ युक्ती फॉलो करून पाहा..

3 fan cleaning hacks that you should know of | पंखा पुसूनही डाग तसेच? धुळीने माखलेला पंख स्वच्छ करण्यासाठी १ खास ट्रिक; मिनिटात पंखा स्वच्छ

पंखा पुसूनही डाग तसेच? धुळीने माखलेला पंख स्वच्छ करण्यासाठी १ खास ट्रिक; मिनिटात पंखा स्वच्छ

सणवार (Festival) जवळ आल्यानंतर आपण संपूर्ण घराची सफाई करतो (Cleaning Tips). खोलीची सफाई करताना पंखा साफ करायला अनेकांना नको वाटतं. कारण पंख्यावर धूळ साचलेली असते, आणि ही धूळ झाडून किंवा पुसून निघत नाही (Cleaning Hacks). पंख्यावर बऱ्याचदा धुळीचे डागही दिसतात (Fan Cleaning). जे पुसूनही निघत नाही.

घाणेरड्या पंख्यामुळे आपल्या खोलीची शोभाही कमी होते. शिवाय पंखा चालू केल्यानंतर धूळ घरभर पसरते. धुळीमुळे आपण आजारीही पडतो. पंखा हा उंचीवर असतो. ज्यामुळे आपल्याला सीडीचा वापर करावा लागतो. जर आपल्याला झटपट आणि सोप्या पद्धतीने पंखा पुसायचा असेल तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. अगदी काही मिनिटात पंखा स्वच्छ होईल(3 fan cleaning hacks that you should know of).

डस्टिंग ब्रश

भिंतीवरील धूळ साफ करण्यासाठी आपण डस्टिंग ब्रशचा वापर करतो. याच्या वापराने आपण पंखेही स्वच्छ करू शकता. डस्टिंग ब्रश बाजारात कमी किमतीत आणि सहज उपलब्ध आहेत. हे ब्रश खरेदी करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. याच्या वापराने फक्त पंखा नसून, भिंतही स्वच्छ होतील.

किचनमधील 'हे' ५ पदार्थ कधीही खराब होत नाही, कालबाह्य म्हणून अजिबात फेकून देऊ नका; योग्य साठवून ठेवा

व्हॅक्यूम क्लिनर

व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने पंखा देखील साफ करता येतो. पण व्हॅक्यूम क्लिनर अतिशय काळजीपूर्वक वापरावे. जर घरात व्हॅक्यूम क्लिनर नसेल तर, आपण सीडीचा वापर करूनही कापडाने पंखा स्वच्छ करू शकता. भारतीय लोक शक्यतो याच पद्धतीने पंखा स्वच्छ करतात.

चहा-चपातीचा नाश्ता रोज करता? तज्ज्ञ सांगतात, कुणी खावं - कुणी टाळावं? नाहीतर पोट बिघडेल आणि..

डस्टर

पंखे स्वच्छ करण्यासाठी आपण डस्टरचाही वापर करू शकता. यासाठी एका बादलीमध्ये साबणाचं पाणी तयार करा. त्यात डस्टर बुडवून पंखा स्वच्छ पुसून घ्या. यामुळे काही मिनिटात घाण झालेला पंखा स्वच्छ होईल. 

Web Title: 3 fan cleaning hacks that you should know of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.