कॉम्पिटिशन सर्वत्र पाहायला मिळते. शाळेत फर्स्ट येण्यापासून ते जॉब मिळवण्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन आहेच. जॉब मिळवण्यापूर्वी आपल्याला मुलाखतीला सामोरे जावे लागते. बरेच जण त्या कामासाठी पात्र ठरतात, पण मुलाखत देताना त्यांची दातखिळी बसते. इंटरव्ह्यूला जाताना तणाव, घाम येतो. पण असे का होते? शिवाय मुलाखत दिल्यानंतर मनात भीतीचं काहूर निर्माण होते. ही मुलाखत मी कशी उत्तीर्ण होईन? माझ्या बोलण्यातल्या चुका तर काढल्या जाणार नाहीत ना? अशा अनेक शंका उमेदवारांच्या मनात घोंघावत असतात (Interview Tips).
बरेच लोकं इंटरव्ह्यू रूममध्ये प्रवेश करताच नर्व्हस होतात. यामुळे आपल्यात स्किल असूनही ती नौकरी मिळत नाही. असे होऊ नये म्हणून कॉण्फिडेंट राहणं गरजेचं आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे? मुलाखत देताना नर्व्हस न होण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात? पाहूयात(3 Important Things to Do During a Job Interview).
घाबरू नका
मुलाखतीत आपल्याला कोणते प्रश्न विचारतील सांगता येत नाही. मुलाखतकाराने विचारलेला प्रश्न नीट ऐकून घ्या. न घाबरता, कमी शब्दात पूर्ण आत्मविश्वासाने विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्या. कोणतेही उत्तर देण्यापूर्वी घाबरून न जाता नीट विचार करूनच उत्तर द्या. बरेचदा लोक पटकन उत्तर देताना चुकीची उत्तरे देतात, त्यामुळे विचार करून प्रश्नाचे उत्तर द्या.
बाई बाई! रेल्वे ट्रॅकवर सेल्फीसाठी दिली पोझ, हाताला बसली जोरदार धडक..जीवावर बेतले पण..
कंपनीबद्दल माहिती असावी
मुलाखत देण्याआधी कंपनीची माहिती काढून घ्या. त्या कंपनीचा थोडक्यात अभ्यास करून जा. कारण अनेक कंपन्यांमध्ये कंपनीशी संबंधित अनेक प्रश्न विचारला जातो. सध्या प्रत्येक कंपनीचे आपआपले साईट्स आहेत. आपण इंटरनेटच्या मदतीने कंपनीची माहिती काढू शकता. जर आपल्याला कंपनीबद्दल योग्य ज्ञान असेल तर, मुलखातकार तुमच्या उत्तराने इम्प्रेस होऊ शकतो.
पहिल्या धुण्यातच कपड्यांचा रंग गेला, फिका पडला? धुताना पाण्यात टाका १ गोष्ट, रंग जाणार नाही
स्वतःवर फोकस ठेवा
जेव्हा मुलखात देण्यासाठी जाल तेव्हा आत्मविश्वासाने जा. आपल्या बोलण्यावर, चालण्यावर आणि मुख्य म्हणजे पेहराव्याकडे लक्ष ठेवा. शक्यतो फोर्मल कपडे परिधान करा. आपण आपल्या ज्ञानाने आणि वागण्याने त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू शकता. आपल्याला कधीही भीती वाटली तर, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा.