घरात कोणतीही वस्तू किंवा कपडे उघड्यावर पडले असतील तर पाली (Lizards)किंवा उंदिरांमुळे खराब तर होणार नाही ना असा प्रश्न पडतो. पाली घरभर फिरत घरात विष्ठा पसरवत असतात तर अनेकदा खाद्यपदार्थांनाही प्रदूषित करतात. ज्यामुळे फूड (Food Poisoning) पॉयजनिंसारख्या गंभीर आजार उद्भवू शकतात. अशा स्थितीत उंदरांना पळवून लाववण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. ज्यामुळे पाली दूर पळण्यास मदत होईल. (Lizards Removal From Home) पालींना पळवण्यासाठी केमिकल्सयुक्त स्प्रे वापरण्याची काही गरज नाही. घरच्याघरी सोप्या पद्धती वापरू शकता.
पालींना घराबाहेर घालवण्याचा सोपा उपाय
१) पुदिना
पालींना पुदिन्याचा वास आवडत नाही. घराच्या कोपऱ्यावर पेपरमिंट ठेवा. यामुळे उंदिर घरात शिरणार नाहीत. पुदिन्याची पानं बारीक वाटून ती पाण्यात मिसळा आणि या पाण्याने घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर स्प्रे करा. या पद्धतीने पुदिन्याचा वापर केल्यास घरात पाली दिसणार नाहीत.
ढेरी सुटलीये-धड व्यायामही होत नाही? सकाळी रिकाम्या पोटी हा पदार्थ घ्या, झरझर घटेल चरबी
२) तंबाखू
तंबाखू आरोग्यासाठी हानीकारक ठरते त्याचप्रमाणे पालींना पळवण्यसाठी तंबाखू उत्तम उपाय आहे. कारण यात नशायुक्त पदार्थ असतात. ज्याच्या वासाने उंदिर बेशुद्ध पडतात. एका वाटीत तंबाखू घेऊन त्यात २ छोटे चमचे साजूक तूप घाला. हे व्यवस्थित मिसळून चण्याचे किंवा गव्हाचे पीठ यात मिसळून गोळी तयार करा. ज्या ठिकाणी पाली फिरतात तिथे या गोळ्या ठेवा.
लसूण-लाल मिरचीची करा चटपटीत चटणी; गावरान रेसिपी-थंडीत भूक खवळेल, पोटभर जेवाल
३) कांदा-लसणाचा स्प्रे
घरातून पालींना पळवण्यासाठी तुम्ही होममेड स्प्रेचा वापरही करू शकता. हा स्प्रे बनवणं खूपच सोपं आहे. यासाठी तुम्हाला कांदा आणि लसणाचा रस, डेटॉल लिक्वीड किंवा साबणाची पावडर, लवंगाची पावडर घ्यावी लागेल. हे सर्व पदार्थ एकत्र करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरूनन अशा ठिकाणी स्प्रे करा जिथे पाली जास्त येतात. कांदा लसणाची तीव्र वास पालींना अजिबात आवडत नाही. या उपायाने पालींना दूर घालवण्यास मदत होईल.
पालींना पळवण्यासाठी तुम्ही लाल आणि काळी दोन्ही प्रकारच्या मिरच्या वापरू शकता. लाल मिरची आणि काळी मिरची पाण्यात मिसळून घरांत शिंपडा. तिखटपणा आणि वासामुळे पाली घरात शिरणार नाहीत. या पाण्याचा हात तुमच्या डोळ्यांना लागणार नाहीत याची काळजी घ्या.