Join us  

पावसाळ्यात साप घरात येण्याची भीती वाटते? ३ उपाय करा, साप घराच्या आसपासही फिरकणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2024 12:56 PM

Home Remedies To Keep Snakes Away From Your House: पावसाळ्यात अनेकांना घराच्या आसपास, अंगणात साप येण्याची भीती वाटते. तुमच्याही बाबतीत असं असेल तर हे काही उपाय करा...

ठळक मुद्देया उपायांमुळे साप घरात येणार नाहीत किंवा तुमच्या घराच्या आजुबाजुलाही फिरकणार नाहीत.

हल्ली शहरी वस्तींमध्ये, गजबजलेल्या ठिकाणी साप घरात येण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. पण तरीही जे लोक थोडं शहराच्या बाहेरच्या भागात राहतात किंवा ज्या लोकांच्या अंगणात खूप झाडी आहेत, जे लोक शेतात घर बांधून राहतात, अशा लोकांना नेहमीच साप घरात येण्याची भीती वाटते. पावसाळ्यात तर ही भीती खूप जास्त वाढते. त्यामुळेच हे काही उपाय लगेचच करा (how to keep snakes away from home). या उपायांमुळे साप घरात येणार नाहीत किंवा तुमच्या घराच्या आजुबाजुलाही फिरकणार नाहीत. (3 simple tips and tricks to keep snakes away from your house)

साप घरात येऊ नयेत म्हणून उपाय

 

१. कांदा लसूण पेस्ट

ॲनिमल वेबसाईट यांनी दिलेल्या माहितीनुसार साप कांदा आणि लसूण यांच्या उग्र वासाच्या आसपास फिरकत नाही. त्यामुळे कांदा आणि लसूण मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करा.

पावसाळ्यात नेहमीच पोट बिघडतं? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात 'हे' पदार्थ नियमित खा, पोट राहील ठणठणीत 

ती पेस्ट पाण्यात मिसळा आणि हे पाणी तुमच्या घराच्या दरवाज्याजवळ, खिडक्यांमध्ये वेळोवेळी शिंपडा. यामुळे साप घरापासून लांब राहण्यास मदत होईल.

 

२. सापांना दूर ठेवणारी रोप लावा

तुमच्या घराच्या आसपास शक्य झाल्यास लसूण, झेंडू, तुळस, कांदा यांची रोपं लावा. या रोपांमधून जो काही विशिष्ट वास येतो त्या वासामुळे साप त्यांच्यापासून लांब राहातो.

विराट कोहली- अनुष्का शर्मा- अक्षय कुमारसह अनेक सेलिब्रिटी जेवतात सायंकाळी सातच्या आत कारण..

त्यामुळे घराच्या दरवाज्याजवळ, गेटजवळ, खिडकीच्या बाहेरून जमिनीवर ही झाडे नक्की लावा. सापांची भीती खूप कमी होईल.

 

३. ब्लीचिंग पावडर

सापांना तुमच्या घरापासून दूर ठेवण्याचा आणखी एक उपाय म्हणजे ब्लीचिंग पावडर. बाजारातून किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरून तुम्ही ती विकत घेऊ शकता.

पावसाळ्यात बटाट्याला खूपच लवकर कोंब येतात, असे बटाटे खावेत का? वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला...

पाण्यात ब्लिचिंग पावडर कालवा आणि ते पाणी तुमच्या घराच्या आजुबाजुला, बागेत, खिडकीजवळ, दरवाज्याजवळ शिंपडा. या पावडरचा वास जिथे येईल, तिथे साप फिरकणार नाही. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडीसाप