घरातील फरशी स्वच्छ ठेवली तर, घर फ्रेश राहतं. पावसाळ्यात फरशी सतत घाण होत राहते (Cleaning tips). अनेकदा घाणेरड्या पायांमुळे फरशीवर डाग पडतात, ज्याची वेळोवेळी स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे. फरशी पुसूनही घाण होत असेल, किंवा जंतू नष्ट होत नसतील तर, फरशी पुसण्याच्या पाण्यात किचनमधल्या काही वस्तू मिसळा (Mopping). यामुळे फरशी काही मिनिटात स्वच्छ होईल.
शिवाय पावसाळी किडे, डास आणि चिलटं घरात फिरकणार नाही. जर आपल्याला केमिकल उत्पादनांचा वापर करायचा नसेल तर, आपण किचनमधल्या ३ गोष्टींचा वापर करून फरशी पुसू शकता. यामुळे फरशी दिवसभर स्वच्छ राहील, आणि घर फ्रेश वाटेल(3 simple tips that can help you mop your floor correctly).
लिंबाचा रस
लिंबाचा रस नैसर्गिक क्लीनर म्हणून काम करते. लिंबाच्या रसामध्ये असलेल्या घटकांमुळे फरशीवरील जंतू नष्ट होतात. शिवाय फरशीवरील डागही नष्ट होतात. डाग आणि जंतू नष्ट करण्यासाठी आपण पाण्यात लिंबाचा रस मिसळू शकता. यामुळे फरशी स्वच्छ होईलच, शिवाय सुगंधानेही फरशी चमकेल.
जळकट - काळपट भांडी साबणाशिवाय स्वच्छ कशी करावी? लिंबाच्या रसाचा सोपा उपाय; मिनिटात भांडी चकाचक
व्हिनेगर
घर स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. याच्या मदतीने फरशीवरील घाण आणि डाग नष्ट होतील. यासाठी दोन ते तीन चमचे व्हिनेगर पाण्यात मिसळा. हे केवळ फरशी स्वच्छ करत नाही, तर त्याचा सुगंध खोलीला सुगंधित करतो. केमिकल उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण व्हिनेगरचा वापर करू शकता.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याचा वापर करून आपण फरशी पुसू शकता. मॉपिंग करताना पाण्यात मूठभर बेकिंग सोडा मिसळा. या सोप्या उपायाने फरशी क्लिन होईल. कीटकही घराभोवती फिरकणार नाही.