Join us  

बाल्कनीत- खिडक्यांवर कबुतरांचा उच्छाद वाढला? ३ सोपे उपाय - कबुतरांचा करा कायमचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2024 11:55 AM

How To Keep Pigeons Away From Your House: खिडकीमध्ये- बाल्कनीमध्ये कबुतरं किंवा पारवे सारखे येऊन बसत असतील तर हे काही सोपे उपाय करून पाहा.

ठळक मुद्देया पारव्यांना किंवा कबुतरांना कसं पळवून लावायचं, हा प्रश्न पडतो. त्यासाठीच बघा काही अगदी सोपे आणि सहज जमण्यासारखे ३ पर्याय.

हल्ली कबुतरांचा सुळसुळात अनेक ठिकाणी खूपच वाढला आहे. पुर्वी मुंबईतच कबुतरं खूप जास्त प्रमाणात दिसायचे. पण आता मात्र बहुतांश शहरांमध्ये त्यांचा वावर वाढलेला आहे. दिसायला हा पक्षी मोठाचा रुबाबदार आहे. त्याचे लालचुटूक डोळे आणि मानेवर असणारी चमक आकर्षक वाटते. पण जेव्हा हेच पक्षी आपल्या बाल्कनीत, खिडक्यांवर येऊन आपल्याला हैराण करून टाकतात, तेव्हा मात्र ते अगदी नकोसे होऊन जातात. शिवाय जिथे- तिथे विष्ठा करून ते सगळी घाण करतात. त्यामुळे मग या पारव्यांना किंवा कबुतरांना कसं पळवून लावायचं, हा प्रश्न पडतो. त्यासाठीच बघा काही अगदी सोपे आणि सहज जमण्यासारखे ३ पर्याय. (tips and tricks to keep pegions away from your window, balcony)

कबुतरांना किंवा पारव्यांना पळवून लावण्याचे उपाय

 

१. मिरेपूड किंवा लाल तिखट

एक ग्लास पाण्यात १ चमचा लाल तिखट किंवा मिरेपूड घाला. हे मिश्रण चांगलं हलवून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

Anant- Radhika Wedding: ईशा अंबानीने घातला होता सुंदर थ्रीडी गाऊन- बघा काय त्याची खासियत 

कबुतरं जिथे बसतात, त्या भागात हे पाणी शिंपडून ठेवा. त्याच्या वासाने कबुतरं त्या जागी येऊन बसणार नाहीत. दिवसांतून दोन ते तीन वेळा हा उपाय करा.

 

२. बल्ब लावा

कबुतरं अशा ठिकाणी येऊन बसतात जी जागा थोडी थंड, शांत आणि सावलीमध्ये आहे.

मुलांना उत्तम व्यक्ती म्हणून घडवायचं तर टिनएजर्स होण्यापुर्वी त्यांना 'या' ३ गोष्टी शिकवाच... 

ज्या ठिकाणी कबुतरं येऊन बसतात, त्या ठिकाणी जास्त उजेड देणारे लाईट काही दिवस तात्पुरतं कनेक्शन देऊन सोडा. उजेडामुळे कबुतरं तिथे बसणं बंद करतील.

 

३. विंडचिम्स

ज्या ठिकाणी आवाज होतो, त्या ठिकाणी कबुतरं किंवा पारवे बसत नाहीत.

केमिकल्स असलेल्या कुंकवाचे डाग पडतात? हळदीचं १०० टक्के शुद्ध कुंकू घरी कसं करायचं बघा..

त्यामुळे तुमच्या घरात ज्या भागात कबुतरं जास्त बसतात, त्याठिकाणी २- ३ विंडचिम्स लावून ठेवा. वाऱ्यामुळे त्यांची हालचाल झाली की त्याचा आवाज होतो आणि त्या आवाजाने कबुतरं पळून जातात.  

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी