घरातल्या फर्निचरवर धूळ बसते. त्यावर पाणी वगैरे पडलं की फर्निचरवर काळपट डाग पडतात. फर्निचर वरचेवर पुसलं तर धूळ निघून जाते पण काळपट डाग तसेच राहातात. कालांतरानं या डागांमुळे मूळ फर्निचरचा रंग बदलून तो पिवळट, काळपट, मळकट दिसतो. असं फर्निचर कितीही पुसलं तरी स्वच्छ दिसत नाही. घरातलं फर्निचर चमकवण्यासाठी तीन प्रकारचे फर्निचर क्लीनर (homemade furniture cleaner) घरीच तयार करता येतात. घरच्याघरी तयार केलेल्या या फर्निचर क्लीनरमुळे (how to make furniture cleaner) फर्निचरच्या सनमायकावर लागलेले डाग स्वच्छ होवून फर्निचर चकचकीत होतं.
Image: Google
1. ग्लिसरीनचं फर्निचर क्लीनर
ग्लिसरीनपासून फर्निचर क्लीनर तयार करण्यासाठी 1 कप व्हिनेगर, 1 मोठा चमचा ग्लिसरीन, 1 चमचा लिंबाचा रस आणि थोडं ऑलिव्ह ऑइल घ्यावं. क्लीनर तयार करताना आधी एक बाटली घ्यावी. त्यात व्हिनेगर घालावं. नंतर यात लिंबाचा रस, ग्लिसरीन आणि तेल घालावं. नंतर बाटलीचं झाकण लावून सर्व मिश्रण चांगलं हलवून मग वापरावं. हे क्लीनर नियमित वापरल्यास फर्निचरवरचे डाग निघून जातात.
2. व्हिनेगर आणि डिटर्जंट फर्निचर क्लीनर
याप्रकारचं फर्निचर क्लीनर तयार करण्यासाठी 2 मोठे चमचे डिटर्जंट पावडर, 5 मोठ चमचे व्हिनेगर, 2 कप कोमट पाणी आणि 1 स्प्रे बाटली घ्यावी. व्हिनेगर आणि डिटर्जंटपासून फर्निचर क्लीनर तयार करण्यासाठी स्पे बाटलीमध्ये डिटर्जंट पावडर घालावी. नंतर त्यात कोमट पाणी घालावं. बाटली बंद करुन ते चांगलं एकत्र करुन घ्यावं. नंतर बाटलीचं झाकण उघडून त्यात व्हिनेगर घालावं. मिश्रण चांगलं हलवून मग हे मिश्रण फर्निचर स्वच्छ करण्यासाठी वापरावं.
Image: Google
3. बेकिंग सोड्याचं फर्निचर क्लीनर
बेकिंग सोड्याचं फर्निचर क्लीनर तयार करण्यासाठी 1 कप बेकिंग सोडा, 1 कप पाणी घ्यावं. स्पे बाॅटलमध्ये बेकिंग सोडा आणि गरम पाणी समप्रमाणात घ्यावं. ते चांगलं हलवून घ्यावं. मग हे मिश्रण फर्निचर साफ करण्यासाठी वापरावं. या तीन प्रकारच्या घरगुती फर्निचर क्लीनरमुळे कळकट, मळकट फर्निचर झटक्यात स्वच्छ होतं.