Lokmat Sakhi >Social Viral > पिण्याच्या पाण्याची बॉटल आतून पिवळट झाली? ३ सोप्या टिप्स, न घासता बाटल्या होतील चकाचक

पिण्याच्या पाण्याची बॉटल आतून पिवळट झाली? ३ सोप्या टिप्स, न घासता बाटल्या होतील चकाचक

3 ways to clean drinking water bottles at home : पिण्याची बाटली आतून स्वच्छ करण्यासाठी खास टिप्स, वेळखाऊ काम होईल चटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2023 02:58 PM2023-09-21T14:58:11+5:302023-09-21T15:07:41+5:30

3 ways to clean drinking water bottles at home : पिण्याची बाटली आतून स्वच्छ करण्यासाठी खास टिप्स, वेळखाऊ काम होईल चटकन

3 ways to clean drinking water bottles at home | पिण्याच्या पाण्याची बॉटल आतून पिवळट झाली? ३ सोप्या टिप्स, न घासता बाटल्या होतील चकाचक

पिण्याच्या पाण्याची बॉटल आतून पिवळट झाली? ३ सोप्या टिप्स, न घासता बाटल्या होतील चकाचक

पाणी पिण्यासाठी आपण अनेकदा प्लास्टिक किंवा काचेच्या बाटल्या वापरतो. या बाटल्यांचा रोज वापर केल्याने त्या लवकर खराब होतात. त्यात पिवळट डाग दिसू लागतात. खराब बाटल्या लवकर स्वच्छ न केल्यास त्यातून दुर्गंधी पसरू लागते. व त्यातील बॅक्टेरियामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेळेवर बाटल्या स्वच्छ करायला हवे.

मात्र, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या स्वच्छ करणे काहींसाठी कठीण जाते.या वेळखाऊ कामामुळे इतरही कामे रखडली जातात. पिण्याच्या पाण्याची बॉटल बाहेरून लवकर स्वच्छ होतात. पण आतून लवकर स्वच्छ होत नाही. यासाठी ३ टिप्स वापरून पाहा. या उपायामुळे काही मिनिटात बाटल्या स्वच्छ होतील(3 ways to clean drinking water bottles at home).

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा फक्त जेवण करण्यासाठी नसून, इतरही वस्तू स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरते. पिण्याच्या पाण्याची बॉटल स्वच्छ करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी बाटलीमध्ये ४ चमचे बेकिंग सोडा घाला. नंतर त्यात पाणी भरा. रात्रभर बॉटलमध्ये पाणी तसेच राहूद्या. सकाळी बेकिंग सोड्याचे पाणी फेकून द्या. त्यात स्वच्छ पाणी घालून २ ते ३ वेळा बाटली धुवून घ्या. असं केल्याने न घासता बाटली स्वच्छ होईल.

सेम टू सेम ऐश्वर्या रायसारखी दिसणारी पाकिस्तानी तरुणी, ऐश्वर्यासारखी दिसते म्हंटल्यावर मात्र ती चिडते कारण..

व्हिनेगर

सर्वप्रथम, बॉटल स्वच्छ धुवून घ्या, नंतर त्यात ४ चमचे व्हिनेगर घाला, व उर्वरित बॉटल पाण्याने भरा. बाटली रात्रभर तशीच ठेवा. सकाळी बाटलीतलं व्हिनेगरचं पाणी फेकून द्या. बाटली २-३ वेळा पाण्याने नीट धुवा. व बाटली कोरडी झाल्यानंतर याचा वापर पुन्हा करा.

चांदीचे पैंजण काळे पडले? अर्धा चमचा टूथपेस्ट, काही मिनिटात पैंजण चकाचक

लिंबू

पिण्याच्या पाण्याची बॉटल स्वच्छ करण्यासाठी आपण लिंबाचा वापर करू शकता. यासाठी बाटली पाण्याने भरा, नंतर त्यात २ चमचे बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करा. बाटली रात्रभर अशीच राहू द्या. सकाळी पाणी काढून टाका. नंतर स्वच्छ पाण्याने बाटली धुवून काढा. अशा प्रकारे न घासता पिण्याच्या पाण्याची बॉटल स्वच्छ होईल.

Web Title: 3 ways to clean drinking water bottles at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.