Join us  

सणासुदीच्या स्वयंपाकात भांडी करपली तर..? टेन्शन विसरा, ३ उपाय - मेहनत न करता भांडी होतील चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2023 4:39 PM

3 ways to clean tough burn stains from utensils भांडी करपली की ती स्वच्छ करण्यात नाकीनऊ येतात, भांडी स्वच्छ करण्यासाठी खास ३ उपाय

महिलांच्या किचनमधला सर्वात चिंतेचा विषय म्हणजे करपलेली - जळलेली भांडी. ती स्वच्छ करण्यात नाकीनऊ येतात. तासंतास घासूनही करपलेली भांडी लवकर साफ होत नाही. तळाशी चिकटलेले अन्नाचे कण लवकर निघत नाही. अशावेळी काय करावं सुचत नाही. अनेकदा ४ ते ५ वेळा घासूनही करपलेले डाग निघत नाही.

सणावारात भांडी अधिक काळपट पडतात. आता काही दिवसात गणेशोत्सव या सणाला सुरुवात होईल. या दिवसात भांडी अधिक प्रमाणात खराब होतात. दूधाचं भांडं असो किंवा गोडाचे पदार्थ केलेलं भांडं. या दिवसात भांडी अधिक चिकट आणि कळकट होतात. करपलेली भांडी मेहनत न घेता स्वच्छ करायची असेल तर, ३ पैकी एका गोष्टीचा वापर करून पाहा(3 ways to clean tough burn stains from utensils).

लिंबू

जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण लिंबाचा वापर करू शकता. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते, ज्यामुळे जास्त मेहनत न घेता भांडी स्वच्छ होतील. यासाठी जळलेल्या भांड्यात २ लिंबाचा रस घाला. नंतर त्यात गारम पाणी घालून काही मिनिटांसाठी बाजूला ठेवा. १० मिनिटानंतर भांडं घासून काढा. यामुळे काही मिनिटात करपलेली भांडी स्वच्छ होईल.

फक्त ५ रुपयांचा बेकिंग सोडा आणा आणि कळकट घाणेरड्या उशा करा स्वच्छ, पाहा खास उपाय

व्हिनेगर

व्हिनेगरमुळे भांडी लवकर चकाचक होतात. त्यातील सायट्रिक ऍसिडमुळे भांड्यावर पडलेले काळपट डाग लवकर निघतात. यासाठी करपलेल्या भांड्यात २ चमचे व्हिनेगर घालून ठेवा. ३० मिनिटानंतर त्यात गरम पाणी घाला, व १० मिनिटानंतर भांडं घासून स्वच्छ करा. यामुळे भांडं चकाचक चमकेल.

झणझणीत मिरची नाकाला लावणं तरुणीला पडलं महागात! मेंदूला आली सूज - गेली कोमात

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा फक्त जेवण करण्यासाठी वापरात येत नसून, त्याचा वापर भांडी स्वच्छ करण्यासाठीही होतो. यासाठी एका वाटीत २ चमचे बेकिंग सोडा घ्या, त्यात एक चमचा पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. तयार पेस्ट करपलेल्या भांड्याला लावा. ४० मिनिटानंतर स्क्रबरने भांडं घासा, व कोमट पाण्याने धुवा. यामुळे जळलेले भांडं पूर्णपणे स्वच्छ होईल. 

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल