Join us  

फक्त कांदाच नाही तर, कांद्याच्या सालीने देखील चमकेल करपलेलं भांडं, पाहा भन्नाट वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2023 7:02 PM

3 ways to clean tough burnt stains from utensils with the help of onion भांडं करपलं? टेन्शन कशाला, कांद्याचा करा असा वापर, भांडं होईल चकाचक

जेवण बनवताना अनेकदा भांडी करपतात. तर, काही उष्णतेमुळे काळपट पडतात. अशा जळलेल्या भांड्यांना स्वच्छ करणे म्हणजे एक मोठे टास्कचं म्हणावं लागेल. या भांड्यांची चमक पुन्हा आणणे म्हणजे गृहीणींसाठी टेन्शन. कारण जळालेली भांडी लवकर स्वच्छ होत नाही. भांडी घासून - घासून काहींचे हात दुखायला लागतात.

आपण ही भांडी कांद्याचा वापर करून चमकवू शकता. स्वयंपाकघरात कांदा फक्त फोडणीसाठी वापरण्यात येतो. आपण याचा वापर जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी देखील करू शकता. कांद्याच्या वापराने जळलेला भाग निघून जाईल, व भांडी स्वच्छ चमकतील(3 ways to clean tough burnt stains from utensils with the help of onion).

जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी कांद्याचा करा असा वापर

बेकिंग पावडर आणि कांदा

सर्वप्रथम, भांड्याच्या जळलेल्या भागावर बेकिंग सोडा शिंपडा, कांदा अर्धा कापून घ्या, व हा कांदा जळलेल्या भागावर घासा. आता त्यावर गरम पाणी घालून १५ मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर भांड्याला धुवून घ्या, व सुक्या कापडाने पुसून घ्या.

पंख्यावर धुळीचे थर, काळाकुट्ट झालाय? २ घरगुती सोपे उपाय, डाग गायब-पंखे दिसतील चकाचक

व्हिनेगर आणि कांदा

व्हिनेगरचा वापर अनेक पदार्थ बनवण्यासाठी होतो. पण हा एक क्लीनिग एजंट म्हणून देखील काम करतो. यासाठी एका वाटीत अर्धा कप व्हिनेगर घ्या, त्यात कांद्याचा रस मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण जळलेल्या भांड्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर २ मिनिटांसाठी भांडं गॅसवर मिडीयम फ्लेमवर ठेवा, ब्रशच्या मदतीने भांडं घासून घ्या. याने भांड्यातील काळपटपणा निघेल.

फ्रिजमध्ये भरुन ठेवायच्या पाण्याच्या बाटल्या आतून स्वच्छ करण्याच्या ४ टिप्स, बाटली चकाचक झटपट

कांद्याच्या सालीने चमकेल भांडं

कांद्याच्या सालींचा वापर भांडं चमकवण्यासाठी करू शकता. यासाठी जळलेल्या भांड्यात पाणी भरा, त्यात कांद्याची साल घालून गॅसवर २० ते ३० मिनिटांसाठी ठेवा. आता ब्रशच्या मदतीने भांडं घासून काढा. यामुळे भांडं नव्यासारखे चमकेल.

टॅग्स :किचन टिप्ससोशल व्हायरल