Lokmat Sakhi >Social Viral > स्वयंपाकघरात फार झुरळं झाली? दुर्गंधीही येते? ३ सोपे उपाय- सिंक स्वच्छ आणि झुरळंही गायब

स्वयंपाकघरात फार झुरळं झाली? दुर्गंधीही येते? ३ सोपे उपाय- सिंक स्वच्छ आणि झुरळंही गायब

3 Ways to Get Rid of That Awful Smell in Your Kitchen Sink स्वयंपाकघरात कुबट वास येणं, झुरळं फिरणं काही चांगलं नाही, करा झटपट सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 12:50 PM2023-07-10T12:50:03+5:302023-07-10T12:50:56+5:30

3 Ways to Get Rid of That Awful Smell in Your Kitchen Sink स्वयंपाकघरात कुबट वास येणं, झुरळं फिरणं काही चांगलं नाही, करा झटपट सोपे उपाय

3 Ways to Get Rid of That Awful Smell in Your Kitchen Sink | स्वयंपाकघरात फार झुरळं झाली? दुर्गंधीही येते? ३ सोपे उपाय- सिंक स्वच्छ आणि झुरळंही गायब

स्वयंपाकघरात फार झुरळं झाली? दुर्गंधीही येते? ३ सोपे उपाय- सिंक स्वच्छ आणि झुरळंही गायब

सध्या पावसाळा सुरु आहे, रिमझिम पडणाऱ्या सरीसोबत कांदा भजी खाण्याची मज्जा काही औरच आहे. पावसाळा जितका सुखद अनुभव देणारा ऋतू आहे. तितकेच त्याचे काही तोटे देखील आहे. आता तोटे म्हणाल तर काय? स्किनच्या संबंधित समस्या, वेळेवर कपडे न सुकणे, घरात सर्वत्र कुबट वास, मुख्य म्हणजे किचन सिंकमधून दुर्गंधी पसरणे.

अनेकदा महिला किचन सिंकमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे वैतागलेले असतात. या दुर्गंधीमुळे जेवण करताना अडचण निर्माण होतेच. यासह आरोग्यावर देखील धोका निर्माण होऊ शकते. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी महागडे उत्पादनांचा वापर केला जातो. पण हा खर्च टाळता येऊ शकतो. या उत्पादनांपेक्षा घरगुती उपायांना फॉलो करा(3 Ways to Get Rid of That Awful Smell in Your Kitchen Sink).

किचन सिंकमधून दुर्गंधी काढण्यासाठी उपाय

बेकिंग सोडा

किचन चकचकीत स्वच्छ करण्यासाठी यासह, त्यातून दुर्गंधी घालवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. यासाठी किचन सिंकमध्ये सर्वत्र बेकिंग सोडा शिंपडा. काही वेळ तसेच राहू द्या. त्यानंतर स्क्रबरने किचन सिंक स्वच्छ घासून काढा. व पाण्याने किचन सिंक धुवून काढा. यामुळे सिंकमधून दुर्गंधी येणार नाही यासह झुरळं देखील येणार नाहीत.

पावसाळ्यात घरात ट्यूबभोवती पाकोळ्या-किडे भिरभिरतात? ५ उपाय, किड्यांना न मारता ठेवा घराबाहेर

डांबर गोळी (नॅप्थॅलीन)

बाथरूममधील कुबट वास यासह कीटक पळवण्यासाठी डांबर गोळ्यांचा वापर केला जातो. आपण किचन सिंकमधून दुर्गंधी घालवण्यासाठी डांबर गोळ्यांचा वापर करू शकता. यासाठी किचन सिंक आधी साबण व स्क्रबरने घासून काढा. त्यानंतर किचन सिंकमध्ये डांबर गोळ्या ठेवा. यामुळे किचन सिंक ड्रेनमधून इतर पावसाळी कीटक येणार नाहीत. व दुर्गंधीही निघून जाईल.

प्लास्टिक डिस्पोजेबल बॉक्स वापरून झाल्यानंतर फेकून देता? ४ भन्नाट वापर, किचन राहील स्वच्छ

संत्र्याची सालं

किचन सिंक साफ केल्यानंतरही दुर्गंधी पसरत असेल तर, संत्र्याच्या सालींचा वापर करा. यासाठी किचन सिंक आधी साबणाच्या पाण्याने व स्क्रबरने घासून काढा. त्यानंतर संत्र्याच्या सालीने किचन सिंक साफ करा. १० मिनिटानंतर कोमट पाण्याने किचन सिंक स्वच्छ धुवून काढा.

Web Title: 3 Ways to Get Rid of That Awful Smell in Your Kitchen Sink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.