Lokmat Sakhi >Social Viral > जळकी भांडी स्वच्छ करणं झालं सोपं; फक्त ३ घरगुती टिप्स; न घासता भांडी दिसतील नव्यासारखे

जळकी भांडी स्वच्छ करणं झालं सोपं; फक्त ३ घरगुती टिप्स; न घासता भांडी दिसतील नव्यासारखे

3 Ways to Remove Burned Food from Aluminum Utensils : मिनिटात जळलेल्या भांड्यांचे काळे डाग साफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2024 06:32 PM2024-06-06T18:32:13+5:302024-06-06T18:33:39+5:30

3 Ways to Remove Burned Food from Aluminum Utensils : मिनिटात जळलेल्या भांड्यांचे काळे डाग साफ करा

3 Ways to Remove Burned Food from Aluminum Utensils | जळकी भांडी स्वच्छ करणं झालं सोपं; फक्त ३ घरगुती टिप्स; न घासता भांडी दिसतील नव्यासारखे

जळकी भांडी स्वच्छ करणं झालं सोपं; फक्त ३ घरगुती टिप्स; न घासता भांडी दिसतील नव्यासारखे

स्वयंपाकघरात चमकणारी भांडी सर्वांनाच आवडतात (Cleaning Tips). पण अनेकदा गॅसवर काही शिजवायला विसरल्यामुळे भांडी जळतात. अशा परिस्थितीत भांड्यातील जळलेले काळे डाग साफ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि तरीही ते पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत (Kitchen Tips). अशावेळी आपण हाताने पूर्ण मेहनत घेऊन भांडी घासतो.

भांडी घासताना विविध उपाय अवलंबून पाहतो. पण तरीही भांड्यांवरील डाग सहसा निघत नाही. शिवाय भांड्यांवर तेलकटपणाही तसाच राहतो. जर आपल्याला जळलेली भांडी मेहनत न घेता स्वच्छ करायची असेल तर, काही घरगुती टिप्सचा वापर करून पाहा. काही मिनिटात भांडी चकाचक नव्यासारखे चमकतील(3 Ways to Remove Burned Food from Aluminum Utensils).

बेकिंग सोडा

अनेक वेळा जास्त वेळ अन्न शिजत असेल तर, भांडं करपतं, आणि जळलेली भांडी घासून सुद्धा स्वच्छ होत नाही. अशावेळी आपण बेकिंग सोड्याचा वापर करून पाहू शकता. यासाठी एक लिटर पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा मिसळा. नंतर हे मिश्रण गरम करा आणि त्यात डिशवॉशिंग लिक्विड घाला. तयार मिश्रण करपलेल्या भांड्यात ओता. काही वेळ तसेच ठेवा. नंतर स्क्रबरने स्वच्छ करा.

वजन कमी करायचं तर महिनाभर रात्री 'या' वेळेत जेवा; सुटलेलं पोट होईल सपाट, वजन कमी

लिंबू आणि मीठ

तेल आणि करपलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि मिठाचा आपण वापर करू शकता. लिंबू आणि मीठ फक्त भांडी स्वच्छ करणार नाही तर, यामुळे दुर्गंधी देखील दूर होईल. यासाठी लिंबाच्या रसात मीठ मिसळा. तयार मिश्रण भांडीवर ओता, काही वेळानंतर स्क्रबरने घासा.

पोट, मांड्या-दंड थुलथुलीत दिसतात? 'इवल्याशा' बिया कमी करू शकतात तुमचं वजन..पण कसे?

डिटर्जंट पावडर

सुमारे दोन लिटर पाण्यात डिटर्जंट पावडर मिसळा आणि त्यात करपलेली भांडी भिजत ठेवा. या किचन हॅकच्या मदतीने अगदी घाणेरडी भांडीही सहज साफ करता येऊ शकते. 

Web Title: 3 Ways to Remove Burned Food from Aluminum Utensils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.