पावसाळा जितका मोहक आणि आनंदायी वाटतो (Monsoon). तितकेच याचे काही तोटे देखील आहेत. पावसाळ्यात सर्वत्र ओलावा होतो. ज्यामुळे काही ठिकाणी बुरशी, काही ठिकाणाहून कुबट वास येऊ लागतो (Musty Smell). मुख्य म्हणजे कापडाच्या कपाटातूनही कुबट वास येऊ लागतो (Cleaning Tips). बऱ्याचदा कपडे नीट वाळत नाही. काही कपड्यांमध्ये ओलसरपणा तसाच राहतो.
कुबट वास येणारे कपडे घालावेसे वाटत नाही. एका कपड्यामुळे महागडे ड्रेस, साड्या आणि इतर कपड्यातून कुबट वास येऊ लागतो. तुमच्याही कपाटातून कुबट वास येत असेल तर, घाबरू नका. यावर आपण घरगुती उपाय करून पाहू शकता. यामुळे कपड्यातून कुबट वास येणार नाही. कपडे कायम फ्रेश आणि कोरडे राहतील(3 Ways to Remove Musty Smell from Clothes During Monsoon).
कपाटातून ओलसरपणा आणि कुबट वास काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय
कापूरच्या गोळ्या
कपाटातून कुबट वास येत असेल तर, सर्वात आधी कपात काही वेळासाठी उघडे ठेवा. त्यात ठेवलेले कपडे बाहेर काढा, आणि कपडे फॅनखाली किंवा सूर्यप्रकाशाखाली पसरवून ठेवा. काही वेळानंतर कपाटात कागद पसरवा. त्यावर कपडे ठेवा. तसेच कपड्यांमध्ये कापूरच्या काही गोळ्या ठेवा. यामुळे कपड्यातून कुबट वास येणार नाही.
पावसाळ्यात ५ प्रकारच्या डाळी 'या' पद्धतीने खाल तर पचनक्रिया बिघडेल; वजनही वाढेल
कॉफी
कपड्यांतून कुबट दुर्गंधी येत असेल तर, धुताना डिटर्जंटमध्ये बेकिंग सोडा मिसळा. सुकल्यानंतर कपड्यांतून ओलसरपणाचा वास येणार नाही. याशिवाय कपड्याचा कपाटात कॉफी पावडर ठेवू शकता. यामुळे कुबट वास येणार नाही. या शिवाय आपण बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकता.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा, लिंबू आणि डिटर्जंट वापरामुळे कपड्यातून कुबट गंध येणार नाही. यासाठी एका बाऊलमध्ये पाण्यात डिटर्जंट, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घ्या. त्यात कापड बुडवून कपाट स्वच्छ पुसून घ्या. १ दिवस सुकण्यासाठी ठेवा. नंतर त्यात कपडे ठेवा.