Join us  

बनियनचा रंग पिवळा झालाय? ३ भन्नाट टिप्स, काही मिनिटात बनियन होईल नव्यासारखी पांढरीशुभ्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2023 4:36 PM

3 Ways to Whiten Your White Vests That Have Yellowed : बनियनचा वापर दररोज होतो, पण वारंवार धुवून त्यावर पिवळे डाग पडतात, हे डाग घालवण्यासाठी खास ३ टिप्स..

पांढरेशुभ्र कपडे अंगावर असले की त्यांचा रुबाब काही वेगळाच असतो. अंगावर पांढऱ्या रंगाचे (White Clothes) कपडे रॉयल लूक देतात. त्यामुळे विशेष दिवसानिमित्त अनेक लोकं पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात. काही कालावधीनंतर त्यावर पिवळट डाग पडतात. ज्यामुळे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांची शोभा कमी होते.

पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना मेन्टेन ठेवणं, त्यांचा पांढरा शुभ्र रंग टिकवून ठेवणं हे खरोखरंच अवघड काम आहे. पांढऱ्या कपड्यांसह पुरुषांची बनियन (Vests) देखील पिवळट पडते. वारंवार घासूनही बनियनवरील पिवळट डाग निघत नाही. पांढऱ्या रंगाच्या बनियनची चमक टिकवून ठेवायची असेल तर, काही घरगुती उपाय करून पाहा. यामुळे विशेष मेहनत न घेता बनियनवरील पिवळट डाग तर निघून जाईलच (Washing Tips), शिवाय ती नव्यासारखी दिसेल(3 Ways to Whiten Your White Vests That Have Yellowed).

पिवळट पडलेली बनियन धुण्यासाठी काही घरगुती टिप्स

व्हिनेगर

व्हिनेगरचा वापर फक्त जेवण करण्यासाठी नसून, पिवळट पडलेली बनियन धुण्यासाठीही होऊ शकतो. यासाठी एका बादलीत पाणी घ्या, त्यात व्हिनेगरचे काही थेंब घालून मिक्स करा. नंतर त्यात २० मिनिटांसाठी बनियन भिजत ठेवा. २० मिनिटानंतर बनियन धुवून काढा. धुतल्यानंतर अधिक वेळ बनियन वाळत ठेऊ नका. शक्यतो घरातच वाळत घाला.

गॅरेजमध्ये केली बालाजी टेलीफिल्मची स्थापना, मुलांना सांभाळल्याबद्दल वडील-भावाचे मानले आभार, एकताचं निर्माती होणं सोपं नव्हतं

लिंबू

लिंबाच्या वापराने देखील पिवळट पडलेली बनियन पांढरी होऊ शकते. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात ३ ते ४ लिंबाचा रस घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात बनियन २ तासांसाठी भिजत ठेवा. २ तासानंतर साबणाने बनियन धुवून काढा. यामुळे बनियनवरील पिवळट डाग निघून जाईल.

एक असं बेट जिथे कानाकोपऱ्यात लटकत आहेत 'डेड डॉल्स'. पाहा झाडाला लटकणाऱ्या बाहुल्यांची रहस्मय वस्ती..

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याचा वापर फक्त जेवणासाठी नसून, कपड्यांवरील डाग काढण्यासाठीही होऊ शकतो. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या, त्यात बेकिंग सोडा घालून मिक्स करा. नंतर त्यात बनियन १ तासांसाठी भिजत ठेवा. १ तासानंतर बनियन साबणाने धुवून काढा. या पद्धतीने आठवड्यातून २ वेळा बनियन धुतल्याने, पिवळट पडलेली बनियन नव्यासारखी दिसेल.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल