Join us  

पोटच्या लेकीला पालक भर उन्हात कारमध्येच 'विसरले', मुलीचा 'श्वास' कोंडला..आणि शेवटी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 2:46 PM

3-year-old girl dies of suffocation after parents forget her in car while attending wedding in Rajasthan's Kota : आई - वडिलांचा हलगर्जीपणा मुलीच्या जीवाशी; कारमध्येच गुदमरून चिमुकलीचा अंत..

लहान मुलांचा हलगर्जीपणा असो किंवा त्यांच्याकडून नकळत घडणाऱ्या चुका. आईवडील त्या चुका पदरात घेतात, सुधारण्याची संधी देतात. पण आई - वडिलांच्या हातून देखील नकळत अशा काही चुका होतात, जे मुलांच्या अंगाशी येतं, आणि होत्याचं नव्हतं होतं. असाच एक प्रकार राजस्थानमधील कोटा येथे घडली आहे.

एका ३ वर्षीय मुलीचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे, आणि याला कारणीभूत आई-वडिलांचा निष्काळजीपणा ठरला आहे. नक्की घडलं काय? पालकांचा हलगर्जीपणा चिमुकल्याच्या जीवाशी आलंच कसं? मुलीला वाचवण्यात पालक अपयशी का ठरले? पाहूयात(3-year-old girl dies of suffocation after parents forget her in car while attending wedding in Rajasthan's Kota).

चिमुकलीचा कारमध्ये गुदमरून मृत्यू..

एनडीटीव्हीने पीटीआयच्या वृत्ताचा हवाला देत खतोली पोलिस स्टेशनचे एसएचओ बन्ना लाल यांनी या घटनेला दुजोरा दिल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, बुधवारी १५ मे रोजी, राजस्थानच्या कोटा येथील, जोरावरपुरा गावात एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या लग्न सोहळ्यात प्रदीप नगर यांनी कुटुंबासह हजेरी लावली होती. त्यावेळी हे संपूर्ण कुटुंब कारने त्या ठिकाणी पोहचले.

त्या कारमध्ये प्रदीपसह दोन मुली आणि पत्नी होती. गाडी लग्नस्थळी पोहोचल्यावर पत्नी आणि मोठी मुलगी गाडीतून खाली उतरून पुढे निघाले. यानंतर प्रदीप गाडी पार्क करण्यासाठी गेला. धाकटी मुलगी गोरविका नगर मोठी मुलगी आणि आईसोबत पुढे गेल्याचे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी कार पार्क करून लॉक केली, व प्रदीप आणि प्रदीपची पत्नी आपापल्या नातेवाईकांना भेटायला गेले.

३० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या मुलीसाठी आईबाबा आता शोधताहेत नवरा, लग्नाचं हे काय भलतंच प्रकरण?

परंतु, काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आले, की गोरविका त्यांच्यासोबत नाही आहे. प्रदीप नगर यांना वाटले की, गोरविका पत्नी आणि मोठ्या मुलीसह आहे. तर, गोरविकाच्या आईला वाटले की, ती वडिलांसोबत आहे.

एक ते दोन तास शोध घेतल्यानंतर प्रदीप आणि त्याची पत्नी गाडीकडे परतले. तेव्हा त्यांना गोरविका गाडीच्या मागच्या सीटवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पालकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी चिमुकलीला मृत घोषित केले. परंतु, गोरविकाच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन आणि पोलिसांना तपास करण्यास नकार दिला आहे.

पालकांनी काय काळजी घ्यायला हवी..

१. लहान मुलांना गाडीत झोपवून गाडी पार्क करुन पालकांनी जाऊ नये.

२. उन्हात गाडीत मूल झोपलेलं आहे तर चटकन कामं करुन येऊ असं करु नये.

१० दिवसात तुळस दिसेल डेरेदार - हिरवीगार! फक्त कुंडीत चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट नक्की घाला

३. गाडीच्या काचा बंद, एसी बंद, त्यात गाडी तापते. लहान मुलं अगदी १० वर्ष वयापर्यंतची पण पोळून निघतात.

४. श्वास गुदमरतो.

५. आपल्या मुलांची काळजी आपणच घ्यायला हवी.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाराजस्थान