Join us

जुने झालेले सोफा कव्हर फेकता कशाला? पाहा एक से एक आयडिया- वापरा ४ पद्धतींनी झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2024 18:59 IST

Home Hacks Using Sofa Cover: जुने झालेले सोफा कव्हर ६ वेगवेगळ्या पद्धतींनी वापरण्याच्या या मस्त आयडिया एकदा बघाच...(4 amazing ideas for reusing old sofa cover)

ठळक मुद्देनवे सोफा कव्हर घेताना तुम्ही जुने टाकून देत असाल किंवा कोणाला देऊन टाकत असाल, तर थोडं थांबा

सोफा आता जवळपास प्रत्येकाच्याच घरी असतो. त्या सोफ्याच्या गाद्या जास्त दिवस टिकाव्या म्हणून आपण त्याला कव्हर घालतो. सोफा कव्हर घातल्यानंतर सोफ्याचा लूक तर बदलतोच पण त्यावर काही पडलं तर थेट त्याच्या गादीवर डाग पडत नाहीत. गाद्या खराब होत नाहीत. म्हणूनच अनेक घरांमध्ये तर सोफा कव्हरचे दोन, तीन सेट तयार असतात. आता नवे सोफा कव्हर घेताना तुम्ही जुने टाकून देत असाल किंवा कोणाला देऊन टाकत असाल, तर थोडं थांबा (4 amazing ideas for reusing old sofa cover). कारण त्याचाही खूप उत्तम पद्धतीने वापर करता येतो. बघा जुने झालेले सोफा कव्हर नेमके किती पद्धतींनी आणि कसे वापरता येऊ शकतात...(how to reuse old sofa cover?)

 

जुने झालेले सोफा कव्हर कशा पद्धतींनी वापरावे?

१. कपडे ठेवण्याचा बॉक्स

दोन सारख्या आकाराचे सोफा कव्हर घ्या. ते एकमेकांवर ठेवा आणि मागच्या बाजुने त्याला थोडा जोड द्या. समोरच्या बाजुने एक चेन बसवा आणि त्याचा साडी ठेवण्यासाठी जसा बॉक्स असतो, तसा बॉक्स तयार करा. यामध्ये तुम्ही साड्या, बेडशीट किंवा इतर कपडेही ठेवू शकता.

कोथिंबीर पावडर रेसिपी: हिवाळ्यात कोथिंबीर स्वस्त मिळते; म्हणून एकदाच पावडर करा- वर्षभर वापरा

२. पिशवी 

कितीही असल्या तरी घरात पिशव्या कमीच पडतात. त्यामुळे जुने झालेले सोफा कव्हर वापरून तुम्ही छान वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या तयार करू शकता. सोफा कव्हर जाड असल्याने पिशव्या चांगल्या दणकट होतील. शिवाय कव्हरवर असणाऱ्या डिझाईनमुळे छान आकर्षक दिसतील. 

 

३. पाट- चौरंग कव्हर

बहुतांश घरात लाकडी पाट, चौरंग असतातच. एरवी दररोज आपण त्याचा वापर करत नाही. पण सणासुदीला किंवा घरात एखादी पुजा असल्यावर पाट, चौरंग हमखास लागतात. पाट- चौरंग मांडल्यानंतर त्यावर टाकण्यासाठी छान कव्हर किंवा आसन करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही जुन्या सोफा कव्हरचा वापर करू शकता. 

मुलांचं अभ्यासात लक्षच लागत नाही? ३ गोष्टी करून पाहा, एकाग्रता वाढून भराभर अभ्यास करू लागतील

४. पर्स

सुटे पैसे, नोटा, आधार कार्ड किंवा इतर कोणतेही कार्ड अशा वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी छोट्या छोट्या पर्स असतील तर कधीही चांगले. या सगळ्या पर्स तुम्ही मोठ्या पर्समध्ये टाकल्या की त्यात पसारा होत नाही. म्हणूनच जुने झालेले सोफा कव्हर वापरून तुम्ही त्याच्या पाहिजे त्या आकाराच्या वेगवेगळ्या पर्स नक्कीच करू शकता. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडी