फ्रिजचा वापर बाराही महिने केला जातो. फ्रिज हा किचनमधला मुख्य घटक आहे. त्यात आपण अनेक खाद्य पदार्थ ठेवतो, जे दीर्घकाळ फ्रेश राहतात. पण फ्रिज अधिक काळ साफ न केल्यामुळे त्यातून दुर्गंधी पसरते. ही समस्या बहुतेकांना भेडसावत असते. आपण त्यात अनेक गोष्टी ठेवतो, पण काही वेळानंतर विसरतो.
काही पदार्थ फ्रिजमध्ये कुजतात. ज्यामुळे फ्रिजमधून दुर्गंधी पसरते. फ्रिज आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोन वेळा साफ करायला हवे. आपण देखील रेफ्रिजरेटरच्या दुर्गंधीमुळे हैराण असाल, तर ही ट्रिक नक्की वापरून पाहा. या काही टिप्समुळे फ्रिज काही मिनिटात स्वच्छ होईल व त्यातून दुर्गंधी देखील पसरणार नाही(4 brilliant hacks to remove odour from your fridge).
फ्रिजमधून अनावश्यक सामान काढा
फ्रिजमधून खराब व सडलेले पदार्थ काढून टाका. एक्सपायरी पदार्थ फेकून द्या, व फ्रिज स्वच्छ करा. या उपायामुळे फ्रिजमधून दुर्गंधी पसरणार नाही.
कुलरमधून सतत कुबट वास येतो? दुर्गंधी घरभर पसरते? ४ टिप्स, कुबट वास येणार नाही..
फ्रिजचे कप्पे स्वच्छ करा
फ्रिजमध्ये असलेले प्रत्येक कप्पे स्वच्छ करा. कप्पे स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याची मदत घ्या, एका वाटीत बेकिंग सोडा आणि पाण्याचं मिश्रण तयार करा, या मिश्रणाने संपूर्ण फ्रिज क्लिन करून घ्या. या उपायामुळे फ्रिजमधील दुर्गंधी कमी होईल.
फ्रिजचे शेल्व्स क्लिन करा
फ्रिजमधील संपूर्ण सामान काढल्याने, फ्रिज लवकर स्वच्छ होते. यासाठी फ्रिजमधील शेल्व्स क्लिन करून बाहेर काढून ठेवा, बेकिंग सोडा आणि पाण्याच्या मिश्रणाने फ्रिज स्वच्छ करा.
बाथरूम १० मिनिटात स्वच्छ चकाचक करण्याच्या ६ टिप्स, दुर्गंधी होईल कमी
फ्रिज दुर्गंधी मुक्त ठेवण्यासाठी उपाय
अनकेदा फ्रिज साफ केल्यानंतरही त्यातून दुर्गंधी निघून जात नाही. फ्रिजमधून दुर्गंधी काढण्यासाठी व्हॅनिला एक्सट्रॅक्टमध्ये कॉटन बॉल बुडवा, व हे कॉटन बॉल एका वाटीमध्ये ठेवा. ही वाटी फ्रिजच्या मधोमध ठेवा. या उपायामुळे फ्रिजमधून दुर्गंधी येणार नाही.