Join us  

कपड्यांवर पडलेले गंजाचे डाग निघता - निघत नाही? ४ भन्नाट टिप्स, डाग होतील गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 2:27 PM

4 Clever Ways to Remove Rust Stains from Clothes कपड्यांना गंजाचे डाग पडले तर काय कराल? ४ टिप्स

कपड्यांवर अनेक प्रकारच्या डाग पडतात. काही जेवणाचे, इतर कपड्यांच्या रंगाचे तर काही वेळेला गंजाचे डाग पडतात. कपड्यांवरील गंजाचे डाग लवकर निघत नाही. हे डाग अनेक कारणांमुळे पडतात. गंजलेल्या पृष्ठभागाच्या वस्तूंच्या संपर्कात आल्यामुळे हे डाग पडतात. अनेक वेळा आपण कपडे लोखंडी तारेवर पसरवतो, त्यामुळे गंजाचे डाग कपड्यांवर पडतात. या डागांमुळे कपडे खराब दिसतात.

तुमच्या कपड्यांवर देखील गंजाचे डाग पडले असतील, व हे डाग कसे काढायचे हा विचार करत असाल तर, या ४ भन्नाट टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे कपड्यांवरील गंजाचे डाग काही मिनिटात निघून जाईल(4 Clever Ways to Remove Rust Stains from Clothes).

व्हिनेगर

कपड्यांवरील गंजांचे डाग दूर करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी डागांवर व्हिनेगर लावून काही वेळ भिजत ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने कपडे घासून धुवा. डाग राहिल्यास ही प्रक्रिया पुन्हा एक किंवा दोन वेळा करा, यामुळे गंजाचे डाग निघून जाईल.

१०१ वर्षांच्या आजीचा भार खांद्यावर वाहत कावड यात्रेला निघालेल्या नातवाची कमाल, २७० किलोमीटर पायी प्रवास

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा फक्त जेवण करण्यासाठी नसून, गंजाचे डाग काढण्यासाठी मदत करू शकते. यासाठी बेकिंग सोडामध्ये थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावून ठेवा, व एका तासानंतर हलक्या हातांनी घासून कापड स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे गंजाचे डाग लवकर निघून जाईल.

टूथपेस्ट

कपड्यांवरील गंजाचे डाग काढण्यासाठी आपण टूथपेस्टचा वापर करू शकता. यासाठी कपड्यांवरील गंजाच्या डागावर  टूथपेस्ट लावून एक दिवस ठेवा. नंतर त्यावर पाण्याचे काही थेंब टाका, व हा डाग हलक्या हातांनी घासून काढा. नंतर सामान्य पद्धतीने कापड धुवा. यामुळे गंजाचे डाग दूर होईल.

स्वयंपाकघरात फार झुरळं झाली? दुर्गंधीही येते? ३ सोपे उपाय- सिंक स्वच्छ आणि झुरळंही गायब

लिंबाचा रस

कपड्यांवरील गंजाचे डाग दूर करण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करून पाहा. यासाठी एक किंवा दोन लिंबाचा रस पिळून एका वाटीमध्ये काढून ठेवा. त्यानंतर कापसाच्या मदतीने हा रस कापडावर लावून पंधरा ते वीस मिनिटे उन्हात ठेवा. नंतर हलक्या हातांनी डाग घासून स्वच्छ पाण्याने कापड धुवा.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियास्वच्छता टिप्स